Home Maharashtra जिकडे तिकडे झाले बोगस मतदान,निवडणूक आयोगाद्वारे पारदर्शकता व निष्पक्षतेच्या उडविण्यात आल्या चिंधड्या?…...

जिकडे तिकडे झाले बोगस मतदान,निवडणूक आयोगाद्वारे पारदर्शकता व निष्पक्षतेच्या उडविण्यात आल्या चिंधड्या?… — त्यांना सेवेतून बडतर्फ करावे व त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे,असे मतदारांचे मत…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक..

            काल २ डिसेंबर २०२५ ला महाराष्ट्र राज्यात नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.पण,या निवडणुक दरम्यान विविध ठिकाणी सत्ता पक्षांकडून दबावतंत्राचा उपयोग करण्यात आला असताना महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त व संबंधित निवडणूक अधिकारी हे मुंग गिळून गप्प राहिल्याने त्यांनी निवडणूक नियमांची पायमल्ली केली असल्याचे निदर्शनास आले आहे.

            याचबरोबर अंबड नगरपरिषद मध्ये खाऱ्या मतदारांच्या नावावर बोगस आयडी द्वारे बोगस मतदारांनी मतदान केले असल्याची धक्कादायक माहिती स्वतः खऱ्या मतदारांनी दिली.

                   याचबरोबर गोधनी नगरपंचायत मध्ये चक्क दिडशे मतदारांना मतदान प्रक्रिया अंतर्गत एका बुथच्या टिम प्रमुखांनी मतदानाचा हक्क बज्यावण्यापासून वंचित केले असल्याची गंभीर बाब समोर आली.

          याचबरोबर बुलढाणा येथे आमदार पुत्र बोगस मतदारांच्या माध्यमातून बोगस मतदान करीत असणारी घटना सुध्दा पुढे आली.

       तर बिडगाव नगरपंचायत मध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी बोगस मतदान केले असल्याची माहिती सुद्धा सोशल मिडीयांच्या माध्यमातून जनतेसमोर आली.

                  नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पुढे दबाव टाकणे,मतदार यादी टेबलवर न ठेवता मतदारांना मताधिकारांपासून वंचित करणे,राज्यात जिकडे तिकडे बोगस मतदान करणे,हा प्रकारच दबावतंत्राचा आहे व निवडणूक प्रक्रिया हायजॅक करण्याचा आहे..

            निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न होत असताना महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त,संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी,मतदान केंद्राचे प्रमुख हे चुप राहात असतील व गैर कृतीला सहकार्य करीत असतील तर हेच संबंधित निवडणूक नियमातील पारदर्शकतेच्या व निष्पक्षतेच्या चिंधड्या उडवितात असे दिसून येते आहे.

                नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूका ज्यांनी ज्यांनी हायजॅक करण्याचा प्रयत्न केला,त्या सर्व अधिकाऱ्यांना व महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांना सेवेतून बडतर्फ केले पाहिजे असे महाराष्ट्र राज्यातील मतदारांचे म्हणणे आहे…

         निष्पक्ष निवडणूकांत बाधा आणणे हा देशद्रोह आहे.यामुळे निष्पक्ष निवडणूकीत बाधा आणणारे संबंधित अधिकारी,दबावतंत्राचा उपयोग करणारे पक्ष कार्यकर्ता व चुप बसणारे निवडणूक आयुक्त यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे,असीही मतदारांची भुमिका आहे.