Home उपक्रम लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन व लाईट ऑफ लाईफ ट्रस्टतर्फे करिअर मार्गदर्शन सत्रे उत्साहात…

लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन व लाईट ऑफ लाईफ ट्रस्टतर्फे करिअर मार्गदर्शन सत्रे उत्साहात…

 प्रेम गावंडे

  उपसंपादक

दखल न्युज भारत

              चंद्रपूर : लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन व लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या वतीने चंद्रपूर मधील ३ शाळांमध्ये “आंनदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रमा” अंतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रियदर्शनी कन्या विद्यालय घुग्घुस, इंदिरा गांधी विद्यालय पडोली आणि न्यू इंग्लिश हायस्कूल पांढरकवडा येथे झालेल्या या सत्रांना विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला.

         या कार्यक्रमांचे मार्गदर्शन लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे समन्वयक मुकेश भोयर यांनी केले.

           सत्रात दहावीनंतर योग्य शाखा निवडताना घ्यावयाची काळजी, दहावीनंतर शिक्षणाचे पर्याय व त्यावर आधारीत उपलब्ध विविध करिअरच्या संधी, ध्येय निर्धारणाची गरज तसेच उपलब्ध शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांना सोप्या आणि प्रेरणादायी पद्धतीने देण्यात आली. विषयांची मांडणी विद्यार्थ्यांच्या गरजांशी सुसंगत आणि समजण्यास सुलभ होती.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तिन्ही शाळांच्या मुख्याध्यापिका, सौ.अनू चोथे, डॉ.अपर्णा शुक्ला व सौ. कुंदा चवले यांच्यासह शिक्षकवर्गाने सक्रिय सहकार्य केले.

        लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे सह. समन्वयक रश्मी होले, साक्षी काळे, प्रज्ञा पवार, भीमराव आमटे आणि सुमैया मिर्झा यांनी कार्यक्रमाच्या आयोजनांत महत्त्वाची भूमिका बजावली. या मार्गदर्शन सत्रांमुळे विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयक जागरूकता वाढून भविष्यातील नियोजनाबाबत स्पष्ट दिशा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.