Home क्रीडा पळसगांव येथील न्यू राजे कबड्डी स्पर्धेचा समारोप…  — चिमूर भाजपा मंडळ...

पळसगांव येथील न्यू राजे कबड्डी स्पर्धेचा समारोप…  — चिमूर भाजपा मंडळ अध्यक्ष गजानन गुळधे यांच्या हस्ते बक्षीस वितरण…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

   पळसगांव:- चिमूर तालुकांतर्गत मौजा पळसगांव येथील न्यू राजे कबड्डी क्रिडा मंडळच्या वतीने आयोजित आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी चिमूर भाजपा मंडळ अध्यक्ष गजानन गुळधे यांनी म्हटलं की कबड्डी हा खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून युवकांच्या शारीरिक,मानसिक,आणि क्रिडागुणांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतो आहे.यामुळे युवकांनी मोठ्या प्रमाणात मैदानी खेळांकडे वळावे,असे वक्तव्य बक्षीस वितरण समारंभा प्रसंगी सरपंच गजानन गुळधे यांनी केले.

             कार्यक्रमाप्रसंगी पळसगांव येथील भाजप बूथ अध्यक्ष जानिक बन्सोड,प्रविण गनोरकर,दुमदेव बोरकर,भूषण डाहुले,पळसगांवचे लोकमत पत्रकार विकास खोब्रागडे,मारोती शेंडे,रामभाऊ चौधरी,किरण शिवरकर,न्यू राजे क्रिडा मंडळचे अध्यक्ष सुरज आनंदवार,उपाध्यक्ष नेत्रपाल सोनवाणे,न्यू राजे क्रिडा मंडळचे सचिव अंकित गजभिये,सहसचिव मंगेश शेंडे,न्यू राजे क्रिडा मंडळचे सदस्य निखिल गुळधे,अनिकेत कावळे,कुंदन मेश्राम,अजित गुरुनुले,वैभव मडावी,धर्मपाल मसराम,लखन मेश्राम,अभिषेक कावळे,चंदन शिवरकर,शुभम कोहळे,कबड्डीप्रेमी,स्पर्धक खेळाडू,आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले.