Home Social जेएसपीएम महाविद्यालयात महात्मा ज्योतीराव फुले पुण्यतिथीनिमित्य अभिवादन…    

जेएसपीएम महाविद्यालयात महात्मा ज्योतीराव फुले पुण्यतिथीनिमित्य अभिवादन…    

भाविकदास करमनकर

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

        येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली व्दारा- संचालित, श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे, कला – वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आणि रासेयो विभागाच्या वतीने महात्मा ज्योतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्य अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

         याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्धानी इतिहास विभाग प्रमुख डॉ.राजू किरमीरे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादनाने करण्यांत आली.

          यावेळी महात्मा फुले यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करुन त्यांचे विचार आत्मसात करण्यांचे आवाहन करण्यांत आले याप्रसंगी डॉ.विणा जम्बेवार, डॉ.गणेश चुदरी डॉ. संजय मुरकुटे डॉ.प्रवीण गोहणे प्रा.ज्ञानेश बनसोड डॉ.प्रियंका पठाडे प्रा.मांतेश तोंडरे डॉ.नितेश पुण्यप्रेड्डीवार प्रा.टिकाराम धाकळे प्रा.कैलास खोबरागडे प्रा.भाविकदास करमनकर प्रा. वसंत आवारी प्रा. निवेदिता वटक यांची उपस्थिती होती.

      संचालन व आभार प्रा.प्रशांत वाळके यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी श्री.गोहणे, श्री.लांबट, श्री. नन्नावरे यांच्यासह सांस्कृतिक व रासेयो विभागाच्या सर्व सदस्य विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.