उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
विलास मोहीनकर एक उत्कृष्ट व्यक्तीत्व असून उत्तम पत्रकार व समाजसेवक आहेत.लोकांचे दमदार व निष्पक्ष नेतृत्व करावे व त्यांची नगरसेवक बनून उत्तम सेवा करावी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अंतर्गत ते चिमूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक लढत आहेत.
विलास मोहीनकर हे प्रभाग क्रमांक ०६ मधून अजीतदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चिमूर नगरपरिषदेची निवडणूक लढत असताना त्यांनी प्रचारात मुसंडी घेतली आहे.
प्रशासकीय व शासकीय व्यवस्थेचा दांडगा अनुभव त्यांना आहे.एक कुशल नेतृत्व म्हणून विलास मोहीनकर यांच्याकडे बघितले जाते.
विलास मोहीनकर हे शांत,समजदार,स्वयंमी,अभ्यासू, अनुभवी,संवेदनशील,सतर्क,जागरुक असल्याने प्रभाग क्रमांक ०६ च्या मतदारांचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे.
चिमूर नगरपरिषदेला विलास मोहीनकर यांच्या सारखा प्रभावी नगरसेवक मिळावा असे मतदारांचे म्हणणे आहे.प्रभाग सहा मध्ये वडशी,गदगाव,सोनेगाव आणि चिमूरचा काही भाग येतो आहे.
चिमूर नगरपरिषद निवडणुक प्रचार यंत्रणा शेवटच्या टप्प्यात आली असून विलास मोहीनकर हे निवडून येण्यासाठी सर्थीचे प्रयत्न करीत आहेत.
विलास मोहीनकर यांच्या सारखा कुशल उमेदवार प्रभाग क्रमांक ०६ ला मिळाला असल्याने मतदारांनी त्यांना नगरसेवक म्हणून सेवा करण्याची संधी द्यायला हवी,असा मतदारांचाच कल दिसून येतो आहे.
प्रभाग क्रमांक,०६ मधील शेडेगाव-सोनेगाव येथील जनतेला शासनाने उपलब्ध करून दिलेले,”बांबू प्रशिक्षण केंद्र बंद अवस्थेत पडलेले आहे.
या निवडणुकीच्या माध्यमातून,”जी प्रकल्प रखडल्यागेली आहेत,ती नव्याने सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असे उमेदवार विलास मोहीनकर यांचे स्पष्ट मत आहे.
कागदोपत्री स्वच्छतेबाबत देखावा दाखवून व आश्वाशीत जाहीरनामा तयार करून मने न जिंकता ती पूर्णत्वास कशी आणता येईल हि भूमिका विलास मोहीनकर यांची आहे.
प्रभाग क्रमांक. ६ मध्येच येत असलेला उमा नदी काठावर असलेल्या मौजा कवडसी येथील नागरिकांना ये – जा करण्यासाठी पुलाचे बांधकाम करण्यासंबंधाने आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी व त्यांच्या माजी नगरसेवकांनी प्रयत्न केले नाही.यामुळे भाजपाच्या भुलथापांना मतदारांनी बळी पडू नये असे आवाहन प्रभाव क्रमांक ६ चे उमेदवार विलास मोहीनकर यांनी मतदारांना केले आहे.
जनहितार्थ गंभीर समस्यांची सुडवणूक करण्याबाबत आमदाराला जाणीव नाही,यामुळे त्यांच्या भुलथापांना प्रभाग क्रमांक ०६ च्या मतदारांनी ओळखले पाहिजे असेही उमेदवार विलास मोहीनकर यांचे म्हणणे आहे.
त्यांनी पुढे म्हटले की,सध्याच्या स्थितीत महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत असलेले अजित पवार यांच्या पक्षाच्या तिकिटावर मी निवडणूक लढत असल्याने चिमूर नगर परिषद क्षेत्रातील भरगच्च विकासासाठी आणि युवा पिढीला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची तत्परता दाखवीणार आहे.
विरोधकाला घाम फोडणारे खंबीर नेतृत्व म्हणून भूमिका पार पाडण्यासाठी जनतेनी एकदा निवडून द्यावे अशी त्यांनी मतदारांना विनंती केली आहे.



