शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकांतर्गत मौजा नेरी ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.
तथागत भगवान गौतम बुद्ध, संविधान निर्माते परमपूज्य- बोधिसत्व-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेतील मुळ उद्देशीकांचे वाचन करुन प्रतिज्ञा घेण्यात आली.
कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपयांचत नेरीचे उपसरपंच चंद्रभान कामडी,ग्राम अधिकारी राजेश कांबळे,नेरी ग्रामपंचायतचे सदस्य पिंटु खाटीक,संदीप पिसे,नाना दडमल,वसंता कामडी,ग्रामपंचायत कर्मचारी मिलिंद जांभुळकर,पद्मश्री नागदेवते,संगिता कामडी,संगिता वैरागडे,आदीं आवर्जून उपस्थित होते.



