बाळासाहेब सुतार
निरा नरसिंह प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे ||गुरु दत्त जयंतीचे औचत्य साधून अखंड हरिनाम सप्ताहाच्या पाचव्या वर्षाला सुरवात झाली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज श्री गरु बापूसाहेब महाराज देहुकर यांच्या मार्गदर्शना खाली,, व श्री गुरु सोहम महाराज बापूसाहेब देहुकर, यांच्या हस्ते तुकाराम महाराज गाथा पूजन, विना पूजन, मृदुंग व टाळ, गुरुदत्त मूर्ती पूजा, झेंडा पूजन, करून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात करण्यात आली.
हरीनाम सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी श्रीगुरु सोहम महाराज देहुकर बोलत असताना म्हणाले की पिंपरी बुद्रुक गावाने गेली पाच वर्षापासून सप्ताहाची परंपरा चालू ठेवली इथून पुढे अशीच चालावी या गावासाठी परम भाग्यचा दिवस आहे, गावच्या वतीने अन्नदान सेवा मोठ्या प्रमाणात केली जाते हा संपूर्ण गावासाठी पुण्याचा मार्गच आहे. आमचे देहूकर परिवार पिंपरी बुद्रुक गावाचा कधीच विसर पडू देणार नाही. श्री गुरु सोहम महाराज देहुकर यांचे सप्ताह प्रसंगी उदगार,
सप्ताहाचे आयोजक पिंपरी बुद्रुक गावातील साखर कारखान्याचे संचालक व विद्यमान सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तंटामुक्ती अध्यक्ष, गावचे पोलीस पाटील, आजी, मजी सरपंच, उपसरपंच व चेअरमन सहित भाविक भक्त व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. आलेल्या सर्व वारकऱ्यांसाठी पिंपरी बुद्रुक गावच्या ग्रामस्थांच्या वतीने दररोज महाप्रसाद देण्यात येत आहे.
भक्तिमय वातावरणात अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली.
सकाळी काकडा भजन, अभंगवाणी आणि हरिनामाच्या गजरात गावभर मंगल वातावरण निर्माण झाले. टाळकरी,भावीक ग्रामस्थ, महिला भगिनी आणि युवकांची मोठी उपस्थिती होती. गाथा पूजनानंतर , सामुदायिक हरिनाम आणि टाळ-चिपळ्यांच्या नादात परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला.
येणाऱ्या सात दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन आणि भजनांच्या माध्यमातून संत तत्त्वज्ञानाचा प्रसार होणार आहे. पिंपरी बुद्रुक ग्रामस्थ यांनी सर्वांना सप्ताहामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
अखंड हरिनाम सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय आणि पवित्र वातावरण निर्माण झाले असून, संत तुकाराम महाराजांच्या गाथा पूजनाने या आध्यात्मिक महोत्सवाला विशेष तेज प्राप्त झाले आहे.
दररोज संध्याकाळी आठ ते दहा वेळेत कीर्तन शेवा होनार व अभंगवाणी आणि हरिनामाच्या गजरात गावभर मंगल वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थ, महिला भगिनी आणि युवकांची मोठी उपस्थिती होती. गाथा पूजनानंतर, सामुदायिक हरिनाम आणि टाळ-चिपळ्यांच्या नादात परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला.
येणाऱ्या सात दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन आणि भजनांच्या माध्यमातून संत तत्त्वज्ञानाचा प्रसार होणार आहे. पिंपरी बुद्रुक ग्रामस्थांनी सर्वांना सप्ताहामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
अखंड हरिनाम सप्ताह निमित्त संत तुकाराम महाराजांच्या गाथा पूजनाने या आध्यात्मिक महोत्सवाला विशेष तेज प्राप्त झाले आहे.



