बाळासाहेब सुतार
निरा नरशिंहपुर प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर, यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय कुराश स्पर्धा, दिनांक 23 ते 24 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पार पडल्या.
यामध्ये विद्यानिकेतन स्कूल ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मधील कु.अन्वी गायकवाड प्रथम क्रमांक, कु.श्रेया मुडके द्वितीय क्रमांक,चि.प्रणव कुदळे तृतीय क्रमांक पटवून यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे,अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले,सचिव हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार प्रदिप गुरव,विद्या निकेतन स्कूल अँड जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार,प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले तसेच क्रिडा विभाग प्रमुख शिवराज तलवारे यांचेही अभिनंदन करण्यात आले.



