Home Social जय भवानीगड विकास प्रतिष्ठान( JBVP), लाखेवाडी ता. इंदापूर, जि. पुणे संविधान दिनानिमित्त...

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान( JBVP), लाखेवाडी ता. इंदापूर, जि. पुणे संविधान दिनानिमित्त अनोखा उपक्रम…  

 बाळासाहेब सुतार 

निरा नरशिंहपुर प्रतिनिधी

संविधान दिनाचे औचित्य साधून जय भवानीगड विकास प्रतिष्ठान ( JBVP)संचलित – विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी आणि विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन 26 नोव्हेंबर 2025 रोजी भव्यदिव्य पद्धतीने साजरा करण्यात आला.  

         या कार्यक्रमात 5500 विद्यार्थ्यांनी सामूहिक संविधान वाचनात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांची आसनरचना “७५ वा संविधान दिन” या अक्षरलेखनात व “अशोकचक्र” स्वरूपात करण्यात आली.  

         मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान उद्देशिकेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गणेश पवार यांनी केले.  

        विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू यांच्या वेशभूषेत खास सादरीकरण केले, तसेच देशभक्तिपर गीत व “ऑपरेशन सिंदूर”वरील नृत्य सादर केले.  

        संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ.चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीच्या कर्तव्य–जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.

          तर अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांनी भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य सांगत सर्वांना समान हक्कांच्या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.  

          या प्रसंगी कॉमर्स विभागातील विद्यार्थी सिद्धार्थ कांबळे याच्या इंडियन आर्मी ( अग्निवीर) निवडीबद्दल सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम” गीताने करण्यात आली.  

           सदर कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष श्रीमंत ढोले सर , उपाध्यक्षा डॉ. चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे पाटील, मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, विश्वस्त पृथ्वीराज ढोले , हृषीकेश ढोले, विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार,प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सम्राट खेडकर, शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.