Home Political चिमूर येथे प्रभाग ९ मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन…  —...

चिमूर येथे प्रभाग ९ मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन…  — मुख्य बाजारपेठेतील व्यापारी व व्यवसायिक बांधवांच्या घेतल्या भेटी…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

चिमूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक ९ मध्ये काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ. सारिका नंदेश्वर, तसेच प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार अॅड. धनराज वंजारी व सविता हजारे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

         यानंतर चिमूर मुख्य बाजारपेठेतील व्यापारी आणि व्यवसायिक बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. चिमूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विकासदृष्टिकोनाची त्यांना माहिती देत त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

          यावेळी काँग्रेसचे ओबीसी प्रदेश संघटक धनराज मुंगले, चिमूर विधानसभा समन्वयक डॉ. सतीश वारजुरकर, अविभाऊ अगडे, विजय गावंडे, जुनैद खान, मनीष नंदेश्वर, राजूभाऊ लोणारे यांच्यासह चिमूर नगर परिषद निवडणुकीतील काँग्रेसचे सर्व उमेदवार, तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.