सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी भारतीय ‘ संविधान दिवस ‘ साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश संविधानाचे महत्त्व आणि त्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. संविधानाने भारताला एक मजबूत लोकशाही राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस अर्थातच १०८५ दिवस अथक परिश्रमातून भारतीय संविधान तयार केले, संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे हा एक लिखित दस्तऐवज आहे जो मूलभूत कोड रचना कार्यपद्धती अधिकार आणि सरकार आणि त्यांच्या संस्थांची कर्तव्य आणि नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यांची सीमांकर करणारा फ्रेमवर्क देतो.

संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने व संविधानिक मूल्याबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना वाढवण्यासाठी देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
आज काँग्रेस विधिमंडळ काँग्रेस गटनेते,आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांचे जनसंपर्क कार्यलयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.व भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.ही प्रस्तावना संविधानाचा गाभा आणि भारतीय नागरिकांसाठी मूलभूत मूल्ये दर्शवते. यात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, स्वातंत्र्य आणि समानता यांसारख्या उद्दिष्टांचा समावेश आहे.
याप्रसंगी शहर अध्यक्ष व माजी सभापती कृष्णा राऊत,नगराध्यक्ष साधना वाढई,माजी शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,माजी नगराध्यक्ष लता लाकडे,शेतकरी सहकारी राईस मिलचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष विलास यासलवार,जेष्ठ पदाधिकारी प्रशांत राईचंवार,हिरालाल दुधे,नगरसेवक प्रीतम गेडाम,कवठीचे उपसरपंच राकेश घोटेकार,माजी नगरसेवक चंद्रकांत संतोषवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम,सामाजिक कार्यकर्ते आकाश खोब्रागडे,मृणाल गोलकोंडवार ,प्रशांत तावाडे,कुनाल मालवनकर आदी उपस्थित होते.



