दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादीका
भारताचे ५३ वे मुख्य न्यायाधीश म्हणून सुर्यकांत यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ दिली.
याप्रसंगी लोकसभा अध्यक्ष,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,भारताचे माजी मुख्य न्यायाधीश भुषण गवई,भारताचे गृहमंत्री अमित शहा,संरक्षण मंत्री राजनाथसिंह,इतर मंत्री व मान्यवर उपस्थित होते.
शपथविधी सोहळा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगान झाले व शपथविधी सोहळा पार पडल्यानंतरही राष्ट्रगान झाले.
भारताचे मुख्य न्यायाधीश सुर्यकांत यांचा कार्यकाळ हा संविधानाच्या चौकटीत असणार की चौकट बाह्य असणार हे भारतीय नागरिकांना अनुभवाला येणार आहे.



