Home Maharashtra मटकीच्या भाजी वरुन वादाने केले उग्ररूप धारण,”हाप मर्डर पर्यंत पोहोचले प्रकरण…. ...

मटकीच्या भाजी वरुन वादाने केले उग्ररूप धारण,”हाप मर्डर पर्यंत पोहोचले प्रकरण…. — वडील व मजव्या भावाकडून लहान भावाला जीवघेणी मारहाण… — सिंदेवाही पोलिसांची जलदगतीने कारवाई..‌

   अमान कुरेशी 

जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर..

     दखल न्युज भारत

       सिंदेवाही तालुक्यातील मौजा पेटगाव येथे किरकोळ वादाने उग्र रूप घेत गंभीर मारहाणीचा प्रकार समोर आला आहे.या घटनेत लहान मुलगा मंगल रामचंद्र शेरकुरे हा गंभीर जखमी झाला असून,आरोपी वडील रामचंद्र केशव शेरकुरे व मजवा मुलगा जीवनदास शेरकुरे यांना सिंदेवाही पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

       मिळालेल्या माहितीनुसार,रोजच्या प्रमाणे कुटुंबातील सदस्य रात्रीच्या जेवणासाठी बसले असताना जखमी मुलाला मटकीची भाजी आवडत नसल्याने त्याने दुसरी भाजी मागितली,त्यावरून वाद वाढत गेला. 

        मजव्या भावाला आवाज ऐकू गेल्यावर तो घटनास्थळी धावत आला आणि “हे तुझे रोजचे नाटक” म्हणत त्याने लहान भावाला घरा बाहेर खेचून काठीने आणि कवेलूने बेदम मारहाण केली.या मारहाणीमध्ये वडीलांनीही सहभाग घेत दोघांनी मिळून मुलावर हल्ला चढवला.

          मारहाण इतकी घातक होती की मुलाच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध पडला.त्याला तातडीने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवून उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

          घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम यांच्यासह पोलिसांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.त्वरित कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले.

       ही संपूर्ण कारवाई ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांचन पांडे आणि API सतीश मेश्राम यांच्या नेतृत्वात करण्यात आली…