Home Political श्री.राजू पाटील व श्री.विलास मोहिनकर यांच्या उमेदवारीने प्रभाग ६ मध्ये वाढली चुरस.‌.....

श्री.राजू पाटील व श्री.विलास मोहिनकर यांच्या उमेदवारीने प्रभाग ६ मध्ये वाढली चुरस.‌.. — नगरपरिषद चिमूर अंतर्गत दोन्ही उमेदवार अनुभवी असल्याने त्यांच्याकडे मतदारांचे लक्ष…

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

         श्री‌.राजू पाटील हे महत्वपूर्ण सामाजिक संघटनांचे पदाधिकारी होते.तद्वतच ते तळमळीचे सामाजिक कार्यकर्ता म्हणून जनमानसात ओळखले जातात.

           याचबरोबर श्री.विलास मोहीनकर हे प्रामुख्याने पत्रकार असून यांना राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेचा दांडगा अनुभव आहे.

       नगरपरिषद चिमूरच्या सार्वत्रिक निवडणुकीला अनुसरून प्रभाग ६ मधून श्री.राजू पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत तर श्री.विलास मोहिनकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजितदादा पवार) उमेदवार म्हणून निवडणूकीला सामोरे जात आहेत.

            श्री‌.राजू पाटील आणि श्री.विलास मोहिनकर हे संवेदनशील व्यक्तीमत्व असल्याने नगरसेवक नसतांनाही आतापर्यंत त्यांनी सामाजिक आणि कार्यालयीन कामकाज निकाली काढण्यासाठी अनेक गोरगरिबांना मदत केली आहे.

         प्रभाग क्रमांक ६ मध्ये वडसी,सोनेगाव,शेडेगाव आणि चिमूरच्या काही मतदारांचा समावेश आहे.

           येथील मतदारांनी भाजपाच्या उमेदवारांना यापूर्वी निवडून दिले होते.पण शासकीय व प्रशासकीय स्तरावर त्यांना पकड निर्माण करता आली नाही आणि संबंधित गावातील नागरिकांचे आवश्यक कामे निकाली काढता आले नाही.

          यामुळे प्रभाग ६ मधील मतदार हे सक्षम,संवेदनशील व कार्यक्षम उमेदवारांना निवडून देण्याच्या मनस्थितीत आहेत.

         समाजसेवक श्री‌.राजू पाटील व पत्रकार श्री.विलास मोहिनकर हे दोघेही संवेदनशील,कर्तव्यदक्ष व कार्यक्षम उमेदवार आहेत आणि शासकीय व प्रशासकीय व्यवस्थेवर प्रभाव पाडणारे आहेत.

         यामुळे हे दोन्ही उमेदवार प्रभाग ६ मधील नागरिकांना शासकीय व प्रशासकीय स्तरावर न्याय देऊ शकतात आणि या प्रभागातील नागरिकांचे कामे निकाली काढू शकतात एवढी धमक त्यांच्यात आहे.

          म्हणूनच श्री.राजू पाटील व श्री.विलास मोहीनकर या दोन समजदार उमेदवारांमुळे प्रभाग ६ ची निवडणूक चुरशीची होणार आहे.