शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर:- शहरातील सामाजिक कार्यकर्ते बब्बूभाई यांनी राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवत शनिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
बब्बूभाई यांचा काँग्रेस प्रवेश हा ‘घरवापसी’ म्हणूनही पाहिला जात आहे.त्यांनी तब्बल दहा वर्षे भाजपात सक्रिय राहून स्थानिक लोकप्रतिनिधींचे कट्टर समर्थक म्हणून काम केले.
मात्र,मध्यंतरीच्या काळात स्थानिक नेतृत्वाशी मतभेद निर्माण झाल्याने त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली होती.शेवटी काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत त्यांनी भाजपाचा निरोप घेतला.
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनराज मुंगले,चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय गावंडे,गजानन बुटके,जुनेद खान,सतिश वनकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



