बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
निमगाव तालुका इंदापूर येथील कैलासवासी तुकाराम पंढरीनाथ चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधना समयी वय वर्ष 85 होते.
त्यांच्या पश्चात, पत्नी, 2 मुले, 2 सुना, 12 नातू ,9 नाती- असा त्यांचा पाठीमागे मोठा परिवार आहे. तसेच धार्मिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रगतशील बागायतदार म्हणून पंचक्रोशी मध्ये त्यांची मोठी ओळख होती. निमगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी निधनाबद्दल दुःख व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
तसेच विठ्ठल तुकाराम चव्हाण व राजेंद्र तुकाराम चव्हाण, हे नागपंचमीचे मानकरी यांचे ते वडील होते, तर रविराज छत्रभुज राठोड कृषी सहाय्यक पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांचे ते आजोबा होते.



