Home Political इंदापूर मधील सर्वेक्षणात भरत शहाच, म्हणून नगराध्यक्षपदाची उमेदवारी :- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.

इंदापूर मधील सर्वेक्षणात भरत शहाच, म्हणून नगराध्यक्षपदाची उमेदवारी :- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

     कोणत्याही निवडणुकीत जनमताचा कौल आणि लोकांच्या संमतीला अनन्यसाधारण महत्त्व असते. याच निकषावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) इंदापूरमध्ये निवडणूकपूर्व सर्वेक्षण केले.

          यात मंत्री दत्तात्रय भरणे यांचे स्पष्टीकरण सर्वेक्षणात भरत शहा यांचे नाव आघाडीवर आल्यानेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

            पुण्यातील कृषी महाविद्यालयात आयोजित नैसर्गिक शेती परिषदेच्या उद्घाटनासाठी मंत्री भरणे उपस्थित होते. या कार्यक्रमंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी इंदापूरच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. भरणे म्हणाले, इंदापूर शहराच्या विकासात शहा कुटुंबीयांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या आजोबा, वडील आणि चुलत्यांनी शहरात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

            स्वतः भरत शहा यांना सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव असून, त्यांनी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांचे काका कारखान्याचे उपाध्यक्ष होते. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही शहा कुटुंबीयांनी मला मोलाचे सहकार्य केले होते. त्यांची निष्ठा आणि सर्वेक्षणातील आकडेवारी पाहता, पक्षाने त्यांना संधी दिली आहे. ‘सर्वेक्षण’ हाच अंतिम निकष उमेदवारीवरून पक्षात मतभेद नसल्याचे सांगितले.

           गारटकरांच्या नाराजीवर सावध प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, प्रदीप गारटकर हे कालही आमचे नेते होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. निवडणुकीत हार-जित ही प्रक्रियेचा भाग आहे. मात्र, केवळ मनासारखे झाले नाही म्हणून कोणावर खापर फोडण्यात काहीही अर्थ नसतो. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. यावेळी गारटकरांवर थेट टीका करण्याचे भरणे यांनी कटाक्षाने टाळले.