Home Social सीसीआय कापूस खरेदीला झाली सुरवात… — श्रीहरी गजानन जिनिंग इंडस्ट्रिज संचालकाद्वारे...

सीसीआय कापूस खरेदीला झाली सुरवात… — श्रीहरी गजानन जिनिंग इंडस्ट्रिज संचालकाद्वारे सहकार नेते ओमप्रकाश गनोरकर यांचा शाल श्रीफळ देऊन करण्यात आला सत्कार…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

        चिमूर तालुक्यातील श्रीहरी गजानन जिनिंग इंडस्ट्रिज भिसी येथे सिसीआय कापूस खरेदीचा शुभारंभ प्रसंगी चिमूर सहकारी तांदूळ गिरणी अध्यक्ष तथा प्रगतशील शेतकरी ओमप्रकाश गनोरकर यांचा भगवी टोपी परिधान करून व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

        यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजु बानकर,सीसीआय चे गहलोत,श्रीहरी गजानन जिनींग चे प्रो धनराज मुंगले,धीरज मुंगले,कृउबास सचिव दिनेश काशिवार,राजु मेश्राम,अरविंद देठे,शेतकरी उपस्थित होते.

        श्रीहरी गजानन जिनींग इंडस्ट्रिज येथे सीसीआय कापूस खरेदीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणण्याचे आव्हान इंडस्ट्रिजचे संचालक यांनी केले आहे.