Home Political आळंदी नगरपरिषदेसाठी ६७ नामनिर्देशन दाखल, नगराध्यक्षपदासाठी सतीष चोरडीया यांचा अर्ज दाखल…

आळंदी नगरपरिषदेसाठी ६७ नामनिर्देशन दाखल, नगराध्यक्षपदासाठी सतीष चोरडीया यांचा अर्ज दाखल…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक 

आळंदी – आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, आज (16 नोव्हेंबर) एकूण 67 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. 10 नोव्हेंबरपासून सुरू झालेली अर्ज दाखल प्रक्रिया 17 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सुरू आहे.

         आजपर्यंत दाखल झालेल्या नामनिर्देशनांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सतीष कांतीलाल चोरडीया यांनी दोन अर्ज दाखल केला आहे. तर सदस्य पदासाठी तब्बल 65 नामनिर्देशन दाखल झाले असुन यात माजी नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र भोसले, आदित्य घुंडरे, सुनील घुंडरे, तृप्ती महेश कुऱ्हाडे, सोमनाथ कुऱ्हाडे, खुशी बोरूंदिया यांनी नगरसदस्य पदासाठी अर्ज दाखल केले आहे.

          काही उमेदवारांनी दोन पक्षाचे व अपक्ष अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू असताना विविध पक्षांचे उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांची उपस्थिती निवडणूक कार्यालयात लक्षणीय वाढताना दिसत आहे. शहरातील राजकीय घडामोडींना आता वेग येण्याची चिन्हे स्पष्ट झाली असून पुढील दोन दिवसांत आणखी अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नगरसेवक पदासाठी खालील प्रमाणे अर्ज दाखल झाले आहेत.

प्रभाग क्रमांक १ ब घुंडरे सचिन रामकृष्ण (पक्ष)

प्रभाग क्रमांक १ ब घुंडरे आदित्य हनुमंत (२ पक्ष)

प्रभाग क्रमांक १ ब घुंडरे सुनील ज्ञानेश्वर (अपक्ष)

प्रभाग क्रमांक १ अ घुंडरे ज्योती अक्षय (पक्ष व‌ अपक्ष)

प्रभाग क्रमांक १ अ घोळवे प्रियंका युवराज (पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक २ अ उमरगेकर वैजयंता अशोक (पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक २ अ उमरगेकर ज्ञानेश्वरी अशोक (पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक २ अ नेटके अनुपमा तुकाराम (अपक्ष)

प्रभाग क्रमांक २ अ नेटके सोनु अनंत (पक्ष)

प्रभाग क्रमांक २ ब भोसले रामचंद्र दत्तात्रय (पक्ष)

प्रभाग क्रमांक २ ब भोसले अभिषेक रामचंद्र (अपक्ष)

प्रभाग क्रमांक २ ब भोसले संतोष मोहन (पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक २ ब सय्यद निसार मोहम्मद (पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक ३ अ गोगावले आशा आशिष

प्रभाग क्रमांक ३ अ शिर्के वैशाली संजय (पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक ३ अ शिर्के किरण रवींद्र (अपक्ष)

प्रभाग क्रमांक ३ अ कुऱ्हाडे वंदना सोमनाथ (अपक्ष)

प्रभाग क्रमांक ३ ब कुऱ्हाडे सोमनाथ कुंडलिक (पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक ४ ब वहीले राजेश नारायण (पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक ४ अ धुर्वे हिरकणी सुदाम (पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक ४ अ पांचाळ अश्विनी रोहित (पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक ५ अ रासकर संतोष मारुती (२ पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक ५ ब बोरूंदिया खुशी सागर (पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक ५ ब बोरूंदिया शिल्पा सागर (पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक ६ अ कुऱ्हाडे तृप्ती महेश (अपक्ष)

प्रभाग क्रमांक ६ ब कारेकर शिरिष शिवाजी (पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक ७ अ घुंडरे ज्योती अक्षय (अपक्ष)

प्रभाग क्रमांक ७ ब घुंडरे सुनील ज्ञानेश्वर (२ पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक ७ ब गुळुंजकर ज्ञानेश्वर मच्छिंद्र (२ पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक ८ अ आवटे भागवत नारायण (अपक्ष)

प्रभाग क्रमांक ९ ब तापकीर सीमा रामेश्वर (पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक ९ ब चांदगुडे सुनंदा रामचंद्र (२ पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक ९ ब तापकीर नम्रता पद्माकर (पक्ष)

प्रभाग क्रमांक १० अ वाघमारे ज्ञानेश्वर प्रकाश (२ पक्ष)

प्रभाग क्रमांक १० अ धुनगव सुहास शेषराव (पक्ष व अपक्ष)

प्रभाग क्रमांक १० क काळे सुवर्णा दत्तात्रय (अपक्ष)

प्रभाग क्रमांक १० क तापकीर शैला अविनाश (पक्ष)

प्रभाग क्रमांक १० अ वेळकर मंगला रघुनाथ (पक्ष व अपक्ष)