दिनेश कुऱ्हाडे
वृत्त संपादिका
आळंदी :- आगामी आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला गुरुवारी वेग आला. दिनांक 10 नोव्हेंबरपासून सुरू झालेली अर्ज दाखल प्रक्रिया 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार असून, दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे अर्ज स्वीकारले जात आहेत.
आज, 14 नोव्हेंबर 2025 रोजी एकूण आठ नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जयराज देशमुख यांनी दिली.
नगराध्यक्षपदासाठी एकच अर्ज
नगराध्यक्ष पदासाठी आज दौंडकर सुरेश वामनराव (अपक्ष) यांनी नामनिर्देशन दाखल केले आहे.
सदस्य पदासाठी दाखल झालेली नामनिर्देशने
सदस्य पदासाठी विविध प्रभागांमधून खालील अर्ज दाखल झाले…
1. सागर तुळशीराम भोसले – प्रभाग 2 ब (भारतीय जनता पार्टी)
2. कांचन उमेश कुऱ्हाडे – प्रभाग 5 ब (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच अपक्ष — असे दोन अर्ज)
3. अमोल गंगाराम केकान – प्रभाग 9 अ
4. माधवी राहुल चोरडिया – प्रभाग 10 ब (भारतीय जनता पार्टी तसेच अपक्ष — असे दोन अर्ज)
5. माधवी राहुल चोरडिया – प्रभाग 10 क
आज प्राप्त झालेल्या अर्जांची एकूण संख्या आठ असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, आगामी काही दिवसांत नामनिर्देशनांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.



