Home शैक्षणिक ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिराची भार्गवी भोजनेला जिल्ह्यात संस्कृत पाठांतर स्पर्धेत प्रथम क्रमांक…

ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिराची भार्गवी भोजनेला जिल्ह्यात संस्कृत पाठांतर स्पर्धेत प्रथम क्रमांक…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक 

आळंदी : येथील ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेतील भार्गवी भोजने या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय संस्कृत पाठांतर स्पर्धेत चमकदार यश संपादित करत प्रथम क्रमांक पटकाविला. इयत्ता तिसरी-चौथी गटामध्ये ग्रामीण विभागातील ‘संस्कृत पंडित शहाजीराजे भोसले’ पुरस्काराने तिचा गौरव करण्यात आला. दिगंबर जाधव आणि कैवल्य कुरुंद यांनीही उत्तेजनार्थ पुरस्कार मिळवत शाळेचा मान वाढविला.

        या स्पर्धेत जिल्ह्यातील तब्बल चार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. तीव्र स्पर्धेला तोंड देत भार्गवीने मिळवलेले यश विशेष कौतुकास्पद ठरले.

        पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी सभागृह, शिवाजीनगर येथे झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सदस्य मिलिंद एकबोटे, नंदकुमार एकबोटे, सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह निवेदिता एकबोटे, निलिमा हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

        यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे सचिव अजित वडगावकर, पदाधिकारी आणि शिक्षकांनी अभिनंदन केले. या यशाची माहिती मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी दिली.