Home कृषी शाश्वत शेती हीच काळाची गरज :- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे…

शाश्वत शेती हीच काळाची गरज :- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे…

  बाळासाहेब सुतार

 नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी 

        एन्व्हायरमेंट अव्हेन्यू ३१३१ यांच्या पुढाकाराने, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि जिजाऊ इन्स्टिट्यूट, कालठण क्र. १, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत शेती कार्यशाळा आणि प्रदर्शन हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

          कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल रोटेरियन संतोष मराठे यांनी भूषविले, तर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रोटरीचे माजी प्रांतपाल प्रमोद कुमार जेजुरीकर हे विशेष उपस्थित होते.

        या प्रसंगी मंत्री भरणे म्हणाले, शाश्वत शेती ही काळाची गरज आहे. पाणी, माती आणि पर्यावरण यांचे संतुलन राखून शेती केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि भावी पिढ्यांसाठी टिकाऊ शेती प्रणाली निर्माण होईल.

         प्रांतपाल रोटेरियन संतोष मराठे यांनी महिलांमध्ये वाढत्या सर्व्हयकल कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले. तर प्रमोद कुमार जेजुरीकर यांनीभविष्यासाठी शाश्वत शेती हाच योग्य आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे, असे प्रतिपादन केले.

         कार्यशाळेत पर्यावरण संचालक राजेंद्र कुमार सराफ (शाश्वत शेती), मनोहर हके (पाणी व्यवस्थापन), प्रा. भास्कर गटकुळ (झिरो बजेट शेती), संतोष लाटणेकर (मातीचे आरोग्य व पर्यावरण) आणि डॉ.रोटरी इटस् रोटरी कलर ऑफ वाल्हेकरवा जिजाऊ इन्स्टिट्यूट इंदापूर विद्यमाने शाश्वत शेती कार्यशाळा व प्रदर्शन अवेन्यू रवींद्र बनसोड (पर्यावरणपूरक शेती) यांनी मार्गदर्शन केले.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे गोविंद जगदाळे यांनी केले. स्वागत भरत चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन रो शशांक भूमकर आणि सुभाष वाल्हेकर यांनी केले. या उपक्रमासाठी जिजाऊ इन्स्टिट्यूटचे शिक्षक, विद्यार्थी तसेच संस्थापिका प्रा. जयश्री गटकुळ आणि प्राचार्या राजश्री जगताप यांनी मोलाचे सहकार्य केले.