ऋषी सहारे
संपादक
आरमोरी येथे मोठी बाजारपेठ असल्यामुळे आरमोरी मध्ये सतत वाहनाची वर्दळ असते. तसेच आरमोरी वरून वडसा, ब्रह्मपुरी मार्गे मोठ्या प्रमाणे वाहने धावत असतात.
त्याच अनुषंगाने आरमोरी टी पॉईंट (ब्रह्मपुरी ,वडसा रोड) त्या ठिकाणी पोलीस विभागाच्या मदतीने नुकतेच सिग्नल लावण्यात आले आहे.
कारण याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होऊन काही लोक जागीच ठार झालेले आहे याची दखल घेऊन संबंधित विभागाने टी पॉईंट आरमोरी येथे सिग्नल सुरू करून प्रवाशांना एक दिलासा दिला आहे.
जेणेकरून तिथून जाणारे वाहने सिग्नल बघून हळू जाणार आणि कुठलाही अपघात घडणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
तसेच त्या ठिकाणी दोन्ही (ब्रह्मपुरी वडसा) रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर बनवण्याची नागरिकांची मागणी आहे. जेणेकरून भविष्यात कुठल्या त्या ठिकाणी अपघात घडू नये.
तरी सर्व वाहन चालकांना पोलीस विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की आरमोरी टी पॉईंट या ठिकाणी लावलेल्या सिग्नलचा वापर करून आपला पुढील प्रवास सुखकर करावा असे आव्हान करण्यात आले आहे.



