उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
भाजपा हा सत्ताधारी पक्ष असल्याने चिमूर व नागभिड नगरपरिषद,आणि भिसी नगरपंचायत निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद,या नितीचा उपयोग करणार आहे.
कारण यापूर्वी नागभिड आणि चिमूर नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता होती.ती सत्ता परत भाजपाकडे राहावी यासाठी आमदार किर्तीकुमार भांगडीया व त्यांचे पदाधिकारी शर्थीचे प्रयत्न करणार आहेत.याचबरोबर ते भिसी नगरपंचायत निवडणूकीकडे लक्ष केंद्रित करणार हे निश्चित झाले आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा मित्र पक्षांना सोबत घेतोय की एकला चलो निती अंतर्गत पुढे येतोय हे लवकरच स्पष्ट होईल.राष्ट्रीय कांग्रेस पक्षाला दोन्ही नगरपरिषदेवर कब्जा करणारी रननिती आखतानां त्यांच्याकडे सर्वसमावेशकता उद्देश असणे आवश्यक आहे आणि तो असेलच!
माजी खनिकर्म अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य महासचीव डॉ.सतीश वारजूकर,ओबीसी सेलचे राज्य संघटक धनराज मुंगले,चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके,चिमूर शहराध्यक्ष डाॅ.अविनाश अगडे,यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकशक्तीने या निवडणुकीत पुढे येतील असा आशावाद मतदारांना आहे.
वंचित बहुजन आघाडी,रिपाई,बसपा,शिवसेना (उबाठा),शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ व तालुका प्रमुख काय भुमिका घेतात यावर चिमूर,नागभिड नगरपरिषद व भिसी नगरपंचायत निवडणुकीचा खेळ असणार आहे.
पण,भाजपा विरुद्ध काँग्रेस असीच सरळ लढत नागभिड,चिमूर,भिसी येथे यावेळी बहुतांश बघायला मिळणार आहे..
जनतेच्या कामाला महत्व देणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर,”स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवलंबून असतात.तेच पदाधिकारी इकडचे मतदार तिकडे फिरवण्याची क्षमता ठेवतात..
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक मतदार हे स्थानिक पदाधिकाऱ्यांना ओळखून असतात.यामुळे ते कुणाला महत्व द्यायचे आणि कुणाला महत्व द्यायचे नाही या भुमिकांवर ठाम असतात किंवा विचारपूर्वक निर्णय घेतात.
यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सहज घेणाऱ्या नसतात तर मनातून पणाला लावणाऱ्या असतात…



