Home Political उद्या बिहार बोलणार….

उद्या बिहार बोलणार….

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

        उद्या १४ नोव्हेंबर,बिहार विधानसभेच्या २४३ मतदारसंघाची मतगणना उद्याला होणार आहे.यामुळे उद्या बिहार बोलणार आहे.

           या विधानसभा निवडणुकीत मतदार जिंकतात की पक्ष जिंकतात हे ईव्हिएम मशीन उद्याला स्पष्ट करेल.बिहारमध्ये एनडिए परत सत्तेवर आली तर कदाचित बिहार बोलणार,पण बिहार बोलणार नाही असे काहीसे चित्र असेल.

         दुसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी झाले तर पहिल्या टप्प्याचे मतदान 6 नोव्हेंबर रोजी झाले होते.निवडणूक निकाल 14 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.

        या निवडणुकीत दोन आघाड्यांमध्ये सत्ताधारी एनडीए विरुद्ध महागठबंधन यांच्यात महत्त्वाची लढत आहे.याचबरोबर बसपा नेमके काय परिणामकता दाखवते यावर सुध्दा विधानसभा निकालाचे समीकरण पुढे येणार आहे.

       एनडीए आघाडीत पाच पक्षांचा समावेश आहे.243 जागांची बिहार विधानसभा निवडण्यासाठी भाजप आणि जेडीयूने प्रत्येकी 101 जागांवर निवडणूक लढवली आहे.तर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) 29 जागांवर आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) व हिंदुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम) प्रत्येकी 6 जागांवर निवडणूक लढवली आहे.

       दुसरीकडे महागठबंधनने जागावाटपाची अधिकृत घोषणा केलेली नाही.महागठबंधनमध्ये राष्ट्रीय जनता दल,काँग्रेस,सीपीआय (एम-एल), सीपीआय आणि विकासशील इंसान पार्टी (वीआयपी) यांचा समावेश आहे.

        आरजेडी 143 जागांवर,काँग्रेस 61 जागांवर,सीपीआयएमएल 20 जागांवर,वीआयपी 13 जागांवर,सीपीआय (एम) 4 आणि सीपीआय 9 जागांवर निवडणूक लढवली आहे.

       अनेकदा एक्झिट पोल्स आणि अंतिम निकालांमध्ये फरक दिसून आलेला आहे,त्यामुळे एक्झिट पोल्स हे अंतिम निकाल नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे.