Home Crime चिमूर तालुकातंर्गत व जांभुळघाट बिटात दारुचा पुरवठा करणारे तस्कर पोलिसांना सापडतील काय?...

चिमूर तालुकातंर्गत व जांभुळघाट बिटात दारुचा पुरवठा करणारे तस्कर पोलिसांना सापडतील काय? — मकोका अंतर्गत? — भाग – ०५….

 रोखठोक 

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

        चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात भरमसाठ देशी विदेशी दारुचा पुरवठा केला जातो आहे.याचबरोबर जांभुळघाट बिटात अवैध पध्दतीने तथा सातत्याने देशी विदेशी दारुचा पुरवठा होत आहे.

       चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात व जांभुळघाट विटात दारुचा पुरवठा करणारे तस्कर हे चिमूर पोलिसांना आणि भिसी पोलिसांना सापडतील काय?हा यक्ष प्रश्न जांभुळघाट परिसरातील व चिमूर तालुक्यातील नागरिकांद्वारे उपस्थित केला जात आहे.

          चिमूर तालुक्यासह जांभुळघाट बिटातील अनेक गावांत होणारा दारुचा पुरवठा हा करोडो रुपयांच्या घरातला आहे.

         चिमूर तालुकातंर्गत खडसंगी,चिमूर,नेरी,भिसी,जांभुळघाट,शंकरपूर,मासळ,मोटेगाव चिमूर परिसरात दारुचा पुरवठा करीत असलेले तस्कर कोण आहेत याचा शोध घेण्याचे व त्यांच्या गांभीर्याने मुसक्या आवळण्याचे काम पोलिस विभाग व महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचे आहे.

       देशी दारुच्या दुकानाचा परवाना हा स्थानिक ठिकाणी ग्राहकांना मद्यप्राशनाची सोय करण्यासाठी आहे.

         असे असताना ग्रामीण भागात सातत्याने देशी विदेशी दारुचा पुरवठा नेमका होतो कुठून?आणि या अवैध दारू व्यवसायाला चालना व आशिर्वाद कोण देतोय,याकडे नागपूर विभाग नागपूर पोलीस आयुक्त (ग्रामीण भाग),आणि जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याची आर्त हाक ग्रामीण भागातील नागरिकांची आहे..

          अवैध दारू व्यवसाय हा एक तस्करीचा भाग आहे.या दारुच्या तस्करीत कुणाकुणाचा सहभाग आहे.तद्वतच सामाजिक मन अशांत करणाऱ्या व सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्यां अशा दारु तस्करांवर पोलिस विभाग मकोका अंतर्गत कारवाई का म्हणून करीत नाही,याकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस लक्ष देतील काय?