दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
पुणे :- राज्यात गेल्या काही काळात आरक्षणाच्या मुद्दयावरून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न काही तथाकथितांकडून करण्यात आला होता.अशात दोन समाजामध्ये निर्माण झालेली दरी भरून काढण्यासाठी राजकीय पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी-मराठा बांधवांना योग्य राजकीय प्रतिनिधित्व द्यावे,अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि ओबीसी एकजूट परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता.१२) केले.
राज्यातील अंदाजे ३७ टक्क्यांहून अधिक ओबीसी आणि २८ टक्क्यांकहून अधिक प्रमाणत असलेला मराठा समाज या दोन प्रमुख घटकांमध्ये ऐक्य राहणे हे महाराष्ट्राच्या सामाजिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पाटील म्हणाले.राजकीय प्रतिनिधित्व देवून या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक समस्या सोडवल्या जावू शकतील, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. राज्यात होवू घातलेल्या नगर परिषद,नगर पंचायाती च्या निवडणुकीत संबंधित भागातील या समाजाची लोकसंख्या लक्षात घेता राजकीय प्रतिनिधत्व दिले; तर त्यांना योग्य राजकीय प्रतिनिधत्व दिले जावू शकते, असे पाटील म्हणाले.
राजकीय पक्षांनी दोन्ही समाजाला निवडणुकीत उमेदवारी देऊन सलोख्याचा संदेश द्यावा,अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.दोन्ही प्रमुख समाजांना स्थानिक सत्तेत आणि निर्णय प्रक्रियेत योग्य वाटा मिळाल्यास, त्यांच्यातील ‘आम्ही विरुद्ध तुम्ही’ ही भावना कमी होऊन, ‘आम्ही सगळे’ ही समन्वयाची भावना वाढेल. दोन्ही समाजांना आपला आवाज स्थानिक पातळीवरील प्रशासनात पोहोचवता येईल आणि राजकीय प्रक्रियेत त्यांची ‘समावेशकता’ वाढेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
मोठ्या लोकसंख्या गटांना सत्तेत स्थान न मिळाल्यास समाजात असंतोष निर्माण होतो, त्यामुळे वेळोवेळी आंदोलने आणि राजकीय अस्थिरता येते. योग्य प्रतिनिधित्व दिल्यास हा असंतोष कमी होईल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.



