दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून (10 नोव्हेंबर) सुरू झाली असली, तरी पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे आजपर्यंत दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या शून्य असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जयराज देशमुख यांनी दिली.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2025 अशी निश्चित करण्यात आली असून, दररोज सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
पहिल्या दिवशी उमेदवारी दाखल न झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रमुख पक्ष व स्थानिक पॅनल्सकडून उमेदवारांची नावं ठरविण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात असून, पुढील काही दिवसांत अर्ज दाखल प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.



