Home Social अहेरी येथे शनिवारला होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिला-बाल रुग्णालयाचे उद्घाटन…

अहेरी येथे शनिवारला होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिला-बाल रुग्णालयाचे उद्घाटन…

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी..

     अहेरी नगरात सूसज्ज महिला बाल रूग्णालयाचे उद्घाटन मूख्यमंञी देवेंद्रजी फडणविस यांच्या शूभहस्ते शनिवारी होणार आहे.

          या खूशखबरीत सिंहाचा वाटा आमदार डाॅ.धर्मराव बाबा आञाम यांचा आहे.वेळोवेळी पाठपूराव करून काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी विषेश प्रयत्न आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

        फक्त भवनासाठी नीधी मंजूर असताना सतत प्रयत्न करून रूग्णालयासाठी आवश्यक साहीत्या साठी अतिरिक्त नीधी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मंजूर करवून घेतले.

        तसेच गडचिरोलीत रूग्णालयाचे इमारत बांधकाम पूर्ण झाल्यावर अनेक वर्ष उद्दघाटना साठी वाट बघावे लागले तरी ती परिस्तिती अहेरीतील महिला व बाल रूग्णालयाची होवू नये म्हणून आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शासन व प्रशासन यांच्या कार्यालयत सतत पाठपूरावा केला होता.म्हणून शनिवारला अहेरीत महिला व बाल रूग्णालयाचे सूसज्ज सर्व उपकरणासहीत उद्दघाटन होत आहे.

        आमदार धर्मरावबाबा आत्राम आपल्याच क्षेञातील नर्स व इतर कर्मचारी नियूक्त करण्याचे सूचना केल्याने अहेरी परीसरातील अनेक सूशिक्षीत बेरोजगारा रोजगार देण्याचे काम आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.