Home Maharashtra अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन…

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन…

भाविकदास करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधी 

        अखिल भारतीय रिपब्लीकन पक्ष तालुका धानोरा च्या वतीने तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे आदिवासी उपप्रादेशीक कार्यालय धानोरा विद्युत वितरण अधिकारी, महावितरण कार्यालय धानोरा यांना 7 नोव्हेंबर रोजी निवेदन पाठविण्यात आले.

        या निवेदनात त्यांनी या वर्षी झालेल्या अतीवृष्टीमुळे सर्व शेतक-यांचे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतक-यांवर मोठे संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांनी बँकेकडुन घेतलेले कर्जही फेड करु शकत नाही. म्हणुन शेतक-यांचे संपुर्ण सरसकट कर्ज माफ करावे. व नुकसान भरपाई म्हणुन हेक्टरी 50,000/-रु. देण्यात यावे.

        ज्या शेतक-यांनी घेतलेले कर्ज परतफेड केलेले नाही अश्या शेतक-यांचे खाते बँकेने बंद केल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेल आहेत. तरी त्यांचे खाते त्वरीत सुरु करण्यात यावे.

        सन 2024 – 2025 मध्ये आदिवासी उपप्रादेशीक विभागाद्वारे आदिवासी विविध सेवा सहकारी संस्था मार्फतीने धान खरेदी करण्यात आले त्या धानाची उचल त्वरीत करण्यात यावी. व तालुक्यातील सर्व केंद्रावर धान खरेदी सुरु करण्यात यावी.

        महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागा मार्फतीने जुने मिटर काढून नविन मिटर लावण्यात आले असुन पुर्वी येणा-या विज बिलाच्या दुप्पट तिष्टीने वाढीव बिल येत असल्याने हा लोंकावर अतिरीक्त भुर्दड असुन हा लोकांवर अन्याय झालेला आहे. या बाबत विद्युत वितरण विभागावरती संताप व्यक्त होत आहे म्हणुन नविन लावलेले मिटर काढुन जुनेच मिटर लाउन देण्यात यावे.

        दुष्काळ व अतिवृष्टी ची परिस्थिती लक्षात घेउन वर्ग 10 व वर्ग 12 विच्या विद्यार्थ्यांची परिक्षा शुल्क् माफ करण्यात यावे.

        प्रलंबीत वनहक्क़ धारकांना शेतजमीनिचे पटटे देण्यात यावे आणि ज्या शेतक-यांना प्रोत्साहन रक्कम अजुनही मिळालेले नाही त्यांना प्रोत्साहन रक्क्म त्यांच्या खात्यात जमा करावी. 

        या मागण्यासाठी 07 नोव्हेंबर ला तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.

     निवेदन देतेवेळी रमेश तुळशिराम बारसागडे ता.अ. अ.भा.रि.प., कुलपती मेश्राम उपाध्यक्ष म.प्र. अ.भा.रि.प., दुर्योधन सहारे उपाध्यक्ष गड. जि. अ.भा.रि.प., भानुदास बांबोळे सचिव ता. अ.भा.रि.प.,महेंद्र मनिराम पदा तालुका उ. अ.भा.रि.प. हे उपस्थित होते.