रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
सध्या चिमूर विधानसभेतील राजकीय परिस्थिती बघता सुशिक्षित, सक्षम, कणखर व दूरदर्शी नेतृत्वाचा अभाव दिसून येतो.विविध प्रकारचे आमिषे दाखवून सत्ताधाऱ्यांनी विरोधकातील अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून घेतलं आहे.
चिमूर-नागभीड विधानसभेतील राजकारण हे फक्त पैश्यावर केंद्रित असून कोणत्याही प्रकारचा विकास आजपर्यंत झालेला नाही.
मोजके व्यावसायिक व धनिक यांच्यापर्यंत मर्यादित असलेल्या या राजकारणात सर्वसामान्य जनतेच्या नेतृत्वाला थारा नाही.
चहा पेक्षा केटली गरम असलेल्या आपल्या चिमूर-नागभीड विधानसभेतील जनता दैनंदिन भ्रष्ट,उन्मादित व्यवस्थेने त्रासली आहे.
भाजप आणि कॉंग्रेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून जनता योग्य पर्यायाचा शोध घेत आहे.
आम आदमी पार्टी चा पंजाब व दिल्ली मॉडल जागतिक स्तरावर कौतुकास्पद ठरलेला आहे. शेतकरी, बेरोजगार, शिक्षण व आरोग्यावर आम आदमी पार्टी ने काम करून आपली वेगळी ओळख तयार केली आहे.
जनतेसमोर योग्य पर्याय म्हणून चिमूर-नागभीड विधानसभेतील सर्वच नगर परिषद व नगर पंचायत निवडणूकित आम आदमी पार्टी आपले उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आम आदमी पार्टीच्या विचारांशी सहमत असलेल्या आणि प्रामाणिकपणे शेतकरी, बेरोजगार, शिक्षण व आरोग्यावर जनसेवा करन्यास इच्छुक असलेल्यांना आम आदमी पार्टी तर्फे उमेदवारी दिली जाईल.
आम आदमी पार्टीतर्फे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनी आप, चिमूर विधानसभा संयोजक प्रा.डॉ. अजय घनश्यामजी पिसे (9503056353) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आप तर्फे करण्यात आले आहे.


