Home Vidarbha अ.भा.मराठा महासंघ अमरावती महानगरच्या मार्गदर्शक पदी गणेश रेखे यांची नियुक्ती…

अ.भा.मराठा महासंघ अमरावती महानगरच्या मार्गदर्शक पदी गणेश रेखे यांची नियुक्ती…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

दर्यापूर येथिल अ.भा. मराठा महासंघाचे अमराती जिल्हा कार्याध्यक्ष गणेश रेखे यांची अ.भा. मराठा महासंघ अमरावतीचे अध्यक्ष भानुदास पाटील बोदडे यांनी मार्गदर्शक पदी नियुक्ति केली आहे. 

          श्री दत्त मंदिर, दर्यापूर येथे नुकतीच मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत समाजाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक,राजकीय उत्थानाचे दृष्टिने विविध अंगाने चर्चा करण्यात आली.

         याचप्रसंगी अ.भा. मराठा महासंघ अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष गणेश रेखे यांची अ.भा. मराठा महासंघ महानगर अमरातीचे मार्गदर्शक पदी अमरावती महानगर अध्यक्ष भानुदास बोदडे यांनी नियुक्ती केली.

          या बैठकिला प्रामुख्याने महानगरचे कार्यकारी अध्यक्ष अनिल उपाख्य अण्णासाहेब धोटे,प्रसिद्धी प्रमुख प्रमोद धोटे, उपाध्यक्ष गजेंद्र पाथरे,कार्यकारी सदस्य व्ही. बी देशमुख, दर्यापूर तालूकाध्यक्ष अनिल गावंडे दर्यापूर, शहर अध्यक्ष राजाभाऊ तराळ,तालुका सरचिटणीस सागर गिर्हे, शहर सरचिटणीस धर्माळे पाटील उपस्थित होते.