Home क्रीडा महिला क्रिकेट वर्ल्ड कप विजय… — भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला...

महिला क्रिकेट वर्ल्ड कप विजय… — भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास – देशभर आनंदाची लहर…

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक 

साकोली :- भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या दमदार कामगिरीने जगाच्या पटलावर इतिहास घडविला आहे. रोमांचक अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिल्यांदाच महिला विश्व क्रिकेट कप आपल्या नावे केला. या ऐतिहासिक विजयाने देशभर आनंद आणि अभिमानाची लहर उसळली आहे.सर्व खेळाडूचे खुप खुप हार्दिक अभिनंदन!

          हा विजय भारतातील बेटींच्या सामर्थ्य, परिश्रम आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची ही कामगिरी केवळ क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित नसून, ती समाजातील प्रत्येक वर्गासाठी प्रेरणादायी ठरली आहे. या विजयाने सिद्ध केले की भारतीय महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, आणि हा विजय महिला सशक्तीकरणाचे जिवंत प्रतीक बनला आहे. 

         संघाच्या कर्णधाराने उत्कृष्ट नेतृत्व आणि रणनीतीचे प्रदर्शन घडविले, तर संघातील सर्व खेळाडूंनी एकजूट, आत्मविश्वास आणि संघर्षशीलतेच्या जोरावर भारताला विजेतेपद मिळवून दिले. निर्णायक क्षणांमध्ये भारतीय गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही उल्लेखनीय खेळ करत विजयाचा सेहरा भारताच्या डोक्यावर चढविला.

         भारतीय महिला क्रिकेट संघाने दाखवून दिले की समर्पण, आत्मविश्वास आणि संघभावना असल्यास कोणतेही ध्येय अशक्य नाही. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीने भारताचा प्रत्येक नागरिक अभिमानाने भरून गेला आहे.

         हा विजय केवळ एक ट्रॉफी नाही, तर प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा सुवर्ण क्षण आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची ही ऐतिहासिक कामगिरी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली जाईल. 

– प्रा.डॉ.जितेंद्र कुमार ठाकूर