उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
महाराष्ट्र राज्यातील २६४ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर निवडणूक लढू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांना कामाला लावले आहे.
१० नोव्हेंबर पासून १७ नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करायाचा आहे.तर १८ नोव्हेंबरला नामनिर्देशन अर्जाची छाननी होणार आहे.
नगपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांचे मतदान २ डिसेंबर होणार आहे तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणूका बऱ्याच कालावधीनंतर होत असल्याने या निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे.
स्थानिक नागरिकांच्या विकासाला गती देणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असल्याने,मतदार हे यावेळी पक्ष पाहून मतदान करणार नाहीत तर उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व बघून मतदान करण्याची शक्यता आहे.
कुठल्याही पक्षाचे नगरसेवक हे पक्ष विचारांच्या दावनिला बांधलेले असल्याने असे उमेदवार हे भुलथापा देण्यासाठी माहेर असतात.परत सत्ता पक्षाला मते दिली तर आपला विकास होऊ शकतो असेही मत पुढे आणले जाऊ शकते.
पण,भाजपा हा पक्ष नागरिकांना,युवकांना,शेतकऱ्यांना,मजूरांना,बेरोजगारांना,शेतकऱ्यांना महत्व देत नाही.यामुळे विकासाची परिभाषा केवळ कामात दडलेली नसून,नागरिकांच्या सर्व कामात व त्यांच्या सर्वांगीण विकासात दडलेली असते हे मतदारांनी समजून घेतले पाहिजे.
भाजपा हा जात व धर्म पाहून नागरिकांना महत्व देत असल्याने,उच्चवर्णीयांच्यापुढे सर्व समाजाच्या नागरिकांना लोटांगण घालायला लावणारा पक्ष असल्याची,या भाजपा पक्षाची ओळख निर्माण झाली असल्याचे राजकीय व सामाजिक चित्र आहे.
या पक्षाच्या धोरणाला सर्व नागरिक,शेतकरी,विद्यार्थी, बेरोजगार,युवक,युवती,महिला वैतागले असल्याचे वास्तव आहे.
भाजपा,राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,बसपा,शिवसेना उबाठा,शिवसेना शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजीतदादा पवार),वंचित बहुजन आघाडी,आम आदमी पार्टी,आजाद पार्टी,भाकपा,माकपा,हे पक्ष नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूका लढविणार आहेत…
असे असले तरी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांकडे अख्या महाराष्ट्र राज्यातील जनतेचे लक्ष केंद्रित झालेले असेल.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी,माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार,माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार,माजी मुख्यमंत्री उध्दवराव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर,युवा नेतृत्व सुजात आंबेडकर,बसपा प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे,आणि मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे,प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या राजकीय भूमिकांकडे मतदार लक्ष ठेवणार आहेत.
भाजपा व त्यांचे मित्र पक्ष सर्वच नगरपरिषदा व नगरपंचायत गिळंकृत करतो असे म्हणत असतील तर ईव्हिएम मशिन ने त्यांना भरभरून निकाल दिला असे होईल…
पण,असे झाले तर महाराष्ट्र राज्यात मोठा उठाव होईल आणि तो देशातील सत्ताधाऱ्यांना हादरे देणारा ठरणार….
याचबरोबर मतदारांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर त्यांनी कुठल्याही उमेदवारांना,रुपये घेऊन मत देवू नये तर आपल्या सदविवेकानुसार मताचा अधिकार बजावले पाहिजे,हाच लोकशाहीसाठी आदर्श ठरेल….



