Home Maharashtra वाघाने घेतला परत एका शेतकऱ्याचा जिव… — चिमूर तालुक्यातील ३ शेतकऱ्यांना...

वाघाने घेतला परत एका शेतकऱ्याचा जिव… — चिमूर तालुक्यातील ३ शेतकऱ्यांना वाघाच्या हल्ल्यात गमवावा लागला जिव… — वन अधिकारी सतर्क होणार काय?…

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादीका 

          कापूस वेचत असताना शंकरपूर येथील शेतकऱ्यांवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले असल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान घडली.

          शंकरपूर येथील शेतकरी श्री.इश्वर भरडे हे शेतावर कापूस वेचत असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला केला.इश्वर भरडे यांना वाघाने मारल्याची घटना शंकरपूर वाशियांना कळताच अनेक नागरिक वनविभागाच्या प्रती रोष व्यक्त करीत संतप्त झाले होते.

         उशिरा घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी शव चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

              ते मुळचे चिमूर तालुक्यातील मौजा शिवरा येथील रहिवासी होते.मागील २५ वर्षांपासून कुटुंबासमवेत ते शंकरपूरला राहात होते.त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.

      चिमूर तालुक्यात मागील २ महिन्याच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या शेताच ३ शेतकऱ्यांवर हल्ला करून ठार केले आहे.

        वाघ निरपराध शेतकऱ्यांचा बळी घेत असताना वन विभागला सदर वाघाचा बंदोबस्त करण्यास यश येताना दिसत नाही.यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर परिसर पिंजून काढला पाहिजे व हल्लेखोर वाघांचा बंदोबस्त केला पाहिजे अशा भावना नागरिकात उमटू लागल्या आहेत.