ऋषी सहारे
संपादक
ब्रम्हपुरी :- शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना तसेच सामान्य नागरिकांना आर्थिक व्यवहार करणे सुलभ व्हावे नागरिकांना शहराकडे न जाता व्यवहारासाठी सोईचे व्हावे यासाठी मुडझा येथे भारतीय स्टेट बँक सुरू करण्यात आली.या शाखेत परिसरातील अनेक शेतकरी, व्यापारी व सामान्य नागरिक आर्थिक व्यवहार करतात.
शेतकरी धान पीक व अन्य पिकांकरिता याच बँकेतून कर्ज घेत असतात.मात्र निसर्गाच्या प्रकोपाने शेतकऱ्यांना दिलासादायक पीक हाती येत नाही.शासन धानाला भाव देत नाही याचा फायदा घेऊन व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत असतात.प्रसंगी शेतकऱ्यांचे बँकेचे कर्ज थकीत राहते.
याच बँकेत श्रावणबाळ योजना, किसान सन्मान निधी, अवकाळी पाऊस निधी, रोजगार हमी निधी,घरकुल निधी, धान बोनस निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.मात्र बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांवर कर्ज असल्याने त्याचे चालू खाते सील करतात.त्यामुळे शेतकऱ्यांना व्यवहार करता येत नाही.
परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळते.उपासमारीची वेळ येत आहे. शासनाचा जीआर आहे की, शेतकऱ्यांना अन्य मिळत असलेल्या निधीतून त्यांचे पीक कर्जात रूपांत करू नये त्यांच्या निधीतून रक्कम कपात करू नये असे असताना देखील बँक शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून मनमानी कारभार करीत आहेत.
कर्मचारी शेतकऱ्यांसोबत सौजन्याची वागणूक दिसून येत नाही.शेतकऱ्यानाची पिळवणूक होत असल्याची माहिती मिळताच शेतकरी नेते कॉम्रेड विनोद झोडगे यांनी त्यांच्यावर झालेल्या न्यायाला वाचा फोडण्यासाठी भारतीय स्टेट बँकेलाच घेराव घातला. व सबंधित अधिकाऱ्यांशी होत असलेल्या अन्याया बाबत चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले यावेळी बँक शाखा अधिकारी यांनी येत्या हप्ता भरात बँक खाते सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी निवेदन देताना संजय लोणारे, लुमदेव खेवले ,कैलास राऊत,भाऊराव ठाकरे,बाजीराव चिमुरकर, अरुण कार मेंगे,योगेंद्र इटनकर , यासह हळदा, बोळधा, कुडेसावली, मुडझा, बल्लारपूर येथील शेतकरी उपस्थित होते.



