Home Social भ्रष्टांविरोधात आमचा आता खरा लढा सुरू :- उपसरपंच रोशन शिवणकर… —...

भ्रष्टांविरोधात आमचा आता खरा लढा सुरू :- उपसरपंच रोशन शिवणकर… — “निर्भिडता गौरव” हे मानचिन्ह देत निर्भिड उपसरपंचांचा साकोली “व्हिएसएफ” कडून सत्कार…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : “ग्रामपंचायतीत जनतेच्या विकासासाठी आलेल्या पैशाची अफरातफर करून भ्रष्टाचार करणे. जनतेसोबत फसवणूक करणे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात अखेर चौकशी होत एकुण १ कोटी ४४ लक्ष ४० हजार ९४४ रूपयांचा भ्रष्टाचार उघडकीस झाला. आणि अजूनही भयंकर घबाड आम्ही उघडकीस आणत असून आमची भ्रष्टांविरोधात लढाई अजून संपलेली नाही, कारण जनतेसमोर सत्य आणने माझे कर्तव्य आहे” असे प्रतिपादन सौंदडचे उपसरपंच रोशन शिवणकर यांनी केले. त्यांचा ( बुध. ०५ नोव्हें.) ला साकोलीतील “व्हीएसएफ” समुह कडून सत्कार करण्यात आला. आणि महाराष्ट्र शासन मा. प्रा. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ वतीने “निर्भिड उपसरपंच” हे मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला. 

           गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत सौंदड येथे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगनमताने कोट्यवधींचे शासकीय विकासनिधीचे अफरातफर प्रकरण उपसरपंच रोशन शिवणकर आणि जागृत शिक्षित ग्रामस्थ व ग्रा. पं. सदस्यांनी अखेर उघडकीस आणले. त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणाचा व आंदोलनात्मक मार्ग अवलंबला होता. अखेर या भ्रष्टांविरोधात लढाई जिंकली आणि चौकशी दरम्यान तब्बल १ कोटी ४४ लक्ष ४० हजार ९४४ रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाले आहे. आणि सुमारे अडीच ते तीन कोटींचे अजूनही घबाड समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, यावर आम्हाला कितीतरी धमक्या व दबावतंत्राचा वापर करण्यात आला पण आम्ही भ्रष्टांविरोधात खंभीर व न भिता उभे होतो. असे उपसरपंच यांनी या सत्कार कार्यक्रमात बोलतांना सांगितले. या भ्रष्टांविरोधात लढ्याला निर्भिड उपसरपंच रोशन शिवणकर, माजी सरपंच गायत्री इरले, ग्रा. पं. सदस्य कैलाश इरले, समाधान बडोले, रेखा राउत, अर्चना डोंगरवार, योगेश्वरी निर्वाण यांसह अनेक ग्रामस्थांनी साथ दिला आहे हे विशेष. 

           महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा “निर्भिड उपसरपंच” हे मानचिन्ह व सत्कार निर्भिडतेचा या समारंभ प्रसंगी “व्हीएसएफ” व्हीआयपी ग्रुप अध्यक्ष अनिल कापगते, साकोली मिडीयाचे आशिष चेडगे, फ्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर बावणे, प्रा. हरिश्चंद्र सोनवाने, से. नि. शिक्षक डी. जी. रंगारी, प्रा. अमोल बोरकर, महिला पत्रकार मनिषा काशिवार, मिडीया चमुचे ऋग्वेद येवले, अंकीत कापगते, मदन कमाने, यशवंत कापगते, मनिष झिंगरे यांसह सौंदड येथील असंख्य ग्रामस्थ आणि मिडिया पत्रकार उपस्थित होते.