Home Maharashtra वंदे मातरम गीत वर्धापन दिनानिमीत्य चिमुर तालुकास्तरीय शासकीय समितीची स्थापना….

वंदे मातरम गीत वर्धापन दिनानिमीत्य चिमुर तालुकास्तरीय शासकीय समितीची स्थापना….

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

चिमुर :- वंदे मातरम गितास 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण होत असल्याने राज्यातील सर्व शासकिय व खाजगी औद्यागिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यक्रम आयोजित करण्याकरीता जिल्हा स्तरीय व तालुका स्तरीय समितीचे गठन करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविण्यता मंत्रालयाने आदेश निर्गमित केल्यानुसार चिमुर तालुका स्तरीय समितीची स्थापना केली आहे. 

        या समितीच्या अध्यक्षपदी तहसिलदार श्रीधर राजमाने व सचिव म्हणुन शहिद बालाजी रायपुरकर शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रचार्य कु. सपना नगराळे हे जबाबदारी सांभाळणार आहेत.

        वंदे मातरम गीतास ७ नोव्हेंबर,२०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण होत असल्याने राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये,कौशल्य वि‌द्यापीठ व कौशल्य विकास केंद्र इत्यादीमध्ये वंदे मातरम गीतगायन,देशभक्तीपर भाषणे,वक्तृत्व स्पर्धा,निबंध लेखन,सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

         कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राज्यस्तरीय समिती दिनांक १३ ऑगस्ट २०२५ अन्वये संबंधित मंत्री (कौ.रो.उ. व ना.) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

          त्याच धरतीवर “वंदे मातरम” गीताच्या १५० व्या वर्धापन दिन” यशस्वीपणे आयोजनासाठी चिमूर तालुकास्तरीय शासकीय समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.

          या समितीमध्ये सदस्य म्हणुन गट विकास अधिकारी नितीन फुलझेले,कौशल्य विकास सहाय्यक आयुक्ताचे प्रतिनीधी कु.अपेक्षा सिंह,गट शिक्षणाधिकारी विशाल बोधाने,जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यलयाचे प्रतिनीधी अविनाश गंगावणे,कु.स्नेहल डोफेकर,सचिन मानकर,चिमुर पोलिस स्टेशनचे ठानेदार दिनेश लबडे,शिक्षण क्षेत्राचे प्रतिनीधी ए.एम.ढोले,अध्यात्मिक प्रतीनीधी ह.भ.प.बारासागडे महाराज,महाराष्ट्र शासनाचे अधिस्विकृत पत्रकार सुरेश डांगे,क्रिडा व साहित्य क्षेत्राचे प्रतीनीधी वैभव दांडेकर,परमाणंद बोरकर,गडकिल्ले संवर्धन समितीचे सदस्य हरीश हटवार,राजकुमार गेडाम, उद्योजक अनिल मेहर,महिला बचत गट प्रमुख सौ.अर्चना बोन्सुले सामाजिक क्षेत्रातील प्रतिनीधी दुर्योधन बावनकर,अर्पना धनविजय आदींचा समावेश आहे.