राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी…
परतीचा अवकाळी पाऊस हा मुसळधार झाल्याने कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.याचबरोबर काही शेतकऱ्यांचे भातपिक खान्याजोगे राहिले नाही.
यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळणे काळाची गरज आहे.म्हणूनच तहसीलदार कुरखेडा यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना,सरपंच व उपसरपंच,सदस्य संघटनेच्याद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की कुरखेडा तालुक्यात अतिवृष्ट्टी मुळेभात पिकाचे नुकसान झाले आहे.नुकसानग्रस्त भातपीकाची मौका चौकशी करून नुकसान भरपाई द्यावी व कुरखेडा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावे.
संपूर्ण कुरखेडा तालुक्यात अतिवृष्टी मुळे संपूर्ण भात पिक नष्ट झाले आहे.कापणीला आलेले पिक नष्ट झाल्यामुळे शेतकरी संपूर्ण पणे हवाल दिल झालेला आहे.शेतकऱ्यांनी लावलेला खर्च सुद्धा भरून निघणार नाही.अशी दैन्य अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे.
तरी प्रत्यक्ष मौका चौकशी करून किंवा सरसकट पंचनामे करून कुरखेडा तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा देण्यात यावा,जर तालुक्यातील तत्काळ पंचमाने न झाल्यास तालुक्यातील सरपंच,उपसरपंच व सदस्य गण व ४५ ग्रामपंचायती अंतर्गत येणारे समस्त शेतकरी वर्ग यांच्या सह पुराडा-कोरची-रामगड टीपाईन्ट या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे.
कुरखेडा येथील तहसीलदार यांनी तात्काळ दखल घेऊन कुरखेडा तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्या संदर्भात अहवाल तयार करून शासनाकडे पाठवावे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना श्री.अशोक वासुदेव उसेंडी तालुका सरपंच संघटना अध्यक्ष कुरखेडा,श्री.मंगेश कराडे तालुका सरपंच संघटना सचिव कुरखेडा,श्री.हुनुकलाले वि.चौधरी उपसरपंच सोनादी,सौ.यमुचता जी.वेदोभ (सरपंच) खेडेगाव,सौ.मिनासी जी गेडाम सरपंच पलसगड,श्री. संतोष रामदास दिचामी सरपंच,सौ.सुमनताई की.बेनाम सयरपंच अंतरगाव,श्री.हेमराज लुमाजी शिवणकर शेतकारी,श्री.चितामन बसंत प्रधान यांच्यासह अनेक सरपंच, उपसरपंच,सदस्य व शेतकरी उपस्थित होते.



