Home Maharashtra डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अनिल मिश्राने केलेल्या घोर अपमानाच्या निषेधार्थ नांदेडला निघणार १०...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अनिल मिश्राने केलेल्या घोर अपमानाच्या निषेधार्थ नांदेडला निघणार १० नोव्हेंबरला महामोर्चा…  — नांदेड येथील संविधान संरक्षण समिती तर्फे संविधान क्रांती महामोर्चा…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात तथा संविधानाच्या बाबतीत तुच्छ व अयोग्य विचारातंर्गत वारंवार गरड ओकणाऱ्याच्या विरोधात,महाराष्ट्र राज्यातंर्गत येत असलेल्या नांदेड जिल्हा येथे संविधान संरक्षण समिती तर्फे येत्या १० नोव्हेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या महामोर्चात लाखोंच्या संख्येने संविधान संरक्षण प्रेमींनी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर वादी विचारसरणीच्या बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

        भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत वाईट पद्धतीने बोलत,संविधानातील आरक्षणाचे तत्त्व,एससी,एसटींचे संरक्षणकवच असलेला अॅट्रॉसिटी अॅक्ट इत्यादी संविधानातील समतावादी तरतुदींच्या विरोधात खोट्या व अपुऱ्या माहितीच्या आधारे ग्वाल्हेर येथील अनिल मिश्रा नामक मनुवादी वकिलाने प्रचाराची द्वेषखोर मोहीम उघडली आहे.

         त्याची ही मोहीम युगप्रवर्तक तथा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा घोर अपमान करणारी तर आहेच परंतु भारतातील एससी-एसटी लोकांना अत्यंत तुच्छ लेखणारी,ओबीसीसह सर्वच मागास वर्गाचे हक्क हिरावणारी व अल्पसंख्यांकावर देखील दहशत बसवू पाहणारी आहे.

           समाजात द्वेष व घृणा पसरवणारा अनिल मिश्रा आणि त्याचे साथीदार अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार अपराधी आहेत.त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत.तरीही या अपराध्यांना अजून अटक झालेली नाही.

       आरएसएस प्रणित भाजपचे सरकार या गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे.भारतातील शोषक मनुवाद्यांनी भारताचे संविधान धोक्यात आणले आहे.यांची डॉ. बाबासाहेब व संविधानविरोधी मोहीम सहन करण्याच्या पलीकडे गेलेली आहे. 

          अशा अवस्थेत समतावादी व आंबेडकरवादी नागरिकांनी गप्प बसणे योग्य नाही.म्हणून मनुवादी अनिल मिश्राला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी या प्रमुख मागणीसाठी,जातीय द्वेषातून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या अंगावर बूट फेकण्याची घृणास्पद कृती करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आणि अन्य काही मागण्या घेऊन नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट असा ‘संविधान क्रांती महामोर्चा काढण्यात येणार आहे.

         तरी या मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन अहंकारी अशा संविधान विरोधी मनुवाद्यांना धडा शिकवावा असे आवाहन संविधान संरक्षण समिती तर्फे करण्यात आले आहे.

मोर्चातील प्रमुख मागण्या…

    1) गुन्हेगार अनिल मिश्रा व त्याच्या जातीयवादी साथीदारांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी.

     2) ईव्हीएम मशीन हटवून देशातील सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात.

     3) संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना करण्यात यावी.

      4) शासनकर्ते व सत्ताधारी राजकीय पक्षाकडून होणारी सेक्युलॅरिझमची पायमल्ली थांबवावी.

    5) सरकारी शाळा,महाविद्यालये बंद करणे थांबतून सरकारी शिक्षण संस्था दर्जेदार बनवण्यात याव्यात.

      6) पाणी,जंगल,जमीन इत्यादी नैसर्गिक संपत्ती भांडवलदारांच्या घशात घालण्याची धोरणे थांबवावीत.भांडवलदारांच्या नफेखोरीला आळा घालावा.

      7) सरकारी आस्थापनांचे बेसुमार खाजगीकरण थांबवावे.

       8) समाज कल्याणाच्या खात्याचा निधी इतस्त्र न वळवता समाज कल्याणच्या कामांसाठीच खर्च करण्यात यावा.

मोर्चा….

   मोर्चा सोमवार दि.10 नोव्हेंबर 2025 रोज सोमवारला निघणार असून मोर्चाची वेळ सकाळी 11:00 वाजता आहे.. 

— मोर्चा निघण्याचे स्थळ : नवा मोंढा मैदान…

मोर्चाचा मार्ग….

    अण्णाभाऊ साठे चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड..

विनीत…‌

संविधान संरक्षण समिती,नांदेड,महाराष्ट्र….

संपर्क क्रमांक…

9860525588,/ 9890298865,/ 9420912209,/ 919922831586,/ 9922031095.

*******

👇👇

     संविधान प्रेमींचा एल्गार”म्हणजे संविधानाचे महत्त्व आणि संरक्षण करण्यासाठी संविधानप्रेमींनी दिलेला नारा किंवा आवाज. 

        हा एल्गार संविधानाचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी,संविधानाच्या तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी केला जातो.

     जेणेकरून देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानाची माहिती मिळावी.समाजाला संविधानाच्या मूल्यांशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे.

           संविधानाच्या आधारावर समानता आणि न्यायाचे ध्येय साधण्यासाठी महिलांचा सन्मान करणे यांसारख्या विषयांवर भर दिला जातो.

         संविधानाच्या मूलभूत अधिकारांचे पालन करणे आणि सामाजिक तसेच वैयक्तिक जीवनात त्यांचे महत्त्व जपणे यावर लक्ष केंद्रित केले जाते.