मी एक माणूस,माझा जन्म का झाला ? याच कुटुंबात,याच जातीत,याच धर्मात ,याच गावात,याच प्रदेशात,याच देशात का झाला हे मला माहित नाही,तसे कुणालाही स्वतःबद्दलच्या या गोष्टीचे ज्ञान नसते,तरी देवाच्या इच्छेमुळे,किंवा दैवात लिहिल्यानुसार,पूर्वजन्मी केलेल्या पापुण्यानुसार माणसाचा जन्म होतो,असे काही लोक म्हणतात,परंतुआभ्यासा अंती मला हे खोटे वाटते,म्हणजे या बोलण्याला काही अर्थ नसतो,म्हणजेच असे बोलणे सत्य नसते,तर साफ साफ खोटे असते,कारण या बोलण्याला काहीच आधार किंवा पुरावे नसतात,आणि तर्क पण चुकीचे वाटतात, नव्हे ते चुकीचेच असतात.म्हणून आपण कुण्या घराण्यात , कुण्या जातीत धर्मात,गावात देशात ( ठिकाण ) जन्मास यावे ,हे कुणाच्याही हाती नसते,तर तो एक योगायोग समजावा.यात अंधश्रद्धा बाळगण्याचे काही कारण नाही,असे माझे मत व विचार आहेत.
यानंतरचा माझ्या जीवनाचा प्रवास सुरू होतो,तो संस्काराचा.जन्मल्या पासून ते मला कळायला लागते तो पर्यंत मी काय खावे प्यावे ल्यावे बोलावे,कसा आणि कोणता विचार करावा ? याचे संस्कार माझ्यावर माझी आई आणि कुटुंबातील सर्व व्यक्ती यांच्या विचारानुसार ठरले.कुटुंबानंतर शेजारी,गल्ली, गाव यातील लोकांच्या संस्कारानुसार मी घडत गेलो,माझे वागणे,बोलणे,राहणे,इतरांशी व्यवहार करणे,माझे विचार कोणते आणि कसे असावेत ? हे सारे भौतिक वातावरणानुसार तयार झाले.( जसे प्रत्येकाचेच होतात तसे).
यानंतर माझ्या जीवनाच्या प्रवासाचा 3 रा टप्पा म्हणजे ‘ मला समज येणे,म्हणजे कळायला लागणे.याचा अर्थ शहाणा होणे,शहाणा होणे याचा अर्थ ” अनुकरण प्रिय होणे ” असा नाही.तर शहाणा होणे,याचा अर्थ ” माझ्या संबंधित ज्या काही गोष्टी,किंवा विषय आहेत , त्या संबंधी विचार करणे होय.आपल्यावर जे संस्कार झाले , त्यातून आपले जसे मन आणि विचार बनले,त्याचा शोध घेणे,म्हणजे जसे की,” माझे हे मन,माझे हे विचार,माझे वागणे,इतरासाठीचे आणि कुटुंबासाठीचे,आणि स्वतःसाठीचे मत विचार जे आहेत,ते कुठून आणि कसे आले? त्यामागची कारणे काय? ती करणे योग्य की अयोग्य,खरे की खोटे? ते सदुपयोगी की ,दुरुपयोगी,ती करणे सगळ्यासाठी उपयोगी की उपद्रवी? उदा.मी ज्या वंशात ( घराण्यात ) ,जातीत,धर्मात,गावात,देशात जन्माला आलो( माझी इच्छा नसताना ) ,ज्या परिस्थितीत (गरीबी,मध्यम,श्रीमंत ) जन्माला आलो ( माझी इच्छा नसताना ) मग त्या घराण्याचा ,जातीचा,धर्माचा ,गावचा,देशाचा मला अभिमान का असला पाहिजे ? याचे उत्तर मला अजूनही सापडले नाही.काही जणांचे मत असे की,आपले कुटुंब,जात,धर्म, गाव,देश यांचे आपले जीवन घडविण्यात मोठे योगदान आहे,मोठे उपकार आहेत,यासाठी यांचे बद्दल कृतज्ञ असले पाहिजे,यांनी किंवा यांच्यामुळे आपल्यावर जे संस्कार झाले,त्याची परतफेड केली पाहिजे,म्हणून या उपरोक्त गोष्टींचा माणसाला अभिमान पाहिजे,नव्हे यांचे साठी प्राण पण दिले पाहिजेत.या विचाराचा प्रचार प्रसार समाजात सगळीकडे चालू असतो.यात बाबा गुरु, मुल्ला मौलवी, फादर यांचा फार मोठा सिंहाचा वाटा असतो.धर्मात जी गुरुशिष्य परंपरा आहे,ती या विचाराचा प्रसार प्रसार करण्यासाठीच झाली आहे.गुरु केल्याशिवाय तरणोपाय नाही,गुरुविण मार्ग कोण दाखविणार ? गुरू नाही केलातरं,मडके नाही भाजले तर ते कच्चे राहते,तसा माणूस कच्चाच राहतो,पक्का बनत नाही,असा खोटा प्रचार चालू असतो.मग एकदा का,माणूस शिष्य झाला,की ,मग त्याच्या मेंदूला झापडे लागतात,कारण गुरुशिवाय ज्ञान नाही,परत असा खोटा. प्रचार चालूच असतो.म्हणून बाबा वाक्यमप्रणाम,मानले जाते.माझी आई संस्कारामुळे अत्यंत धार्मिक होती,विचार स्वभावाने भोळी होती,तिने मला गुरु करून घेण्याबद्दल आयुष्यभर प्रयत्न केला,पण मी गुरू करून घेतला नाही,कारण प्रत्येक गोष्टीत ” सत्य असत्य ” शोधण्याची माझी प्रवृती आहे,त्यामुळे मी माझ्या आईला नेहमीच म्हणायचो की,” माय मी तुझी इच्छापूर्तीसाठी गुरू करून घेण्यास तयार आहे,पण तो का करावा ? मी कुणाचा तरी शिष्य का व्हावे ? याचे उत्तर दे”. तिने अनेक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला,पण तिने माझे समाधान करू शकली नाही, हे तिच्या लक्षात आले.मग मी म्हणालो ” माय,मी ज्या महाराजास गुरु करावे ,असे तुला वाटते,त्या महाराजांकडे मला घेऊन चल, त्या महाराजाने ” गुरूची आवश्यकता आहे का ? म्हणजे धार्मिक गुरू, कान फुकून दीक्षा देणारा,( औपचारिक गुरु) .त्याची माझी चर्चा होऊ दे,या चर्चेत माझे समाधान झाले तर त्या महाराजास मी गुरू करीन,अन्यथा चर्चेत ते हरले तर त्यांनी माझे शिष्य झाले पाहिजे.” ही अट घातल्या नंतर माझी माय मला म्हणाली ” बापू तुझ्या डोक्याला कुण्याही महाराजाचे डोके.लागणार नाही.” असे म्हणून तिने हा विषय थांबविला.आणि माझा धर्मविचाराचा प्रवास मात्र चालूच राहिला.धर्म म्हणजे काय ? त्याची व्याख्या,धर्माचे विचार,त्यातील सत्यता,त्याची आवश्यकता,याबद्दल अनेक संत महात्मे,महामानव,विचारवंत यांना मी पडताळले,पण मला अजूनही या औपचारिक अनेक धर्म,आणि त्याचे वास्तविक दुष्परिणाम याबद्दल यामुळे औपचारिक धर्म,त्याचे कर्मकांड,त्यातील चमत्कार,अंधश्रद्धा,नरबळी, पशू हत्या,धर्मधर्माची भांडणे,विश्रांतीचा भंग,धर्मासाठी दोन देशाची युद्धे हे वास्तव पाहून माणसाला या औपचारिक धर्माची आणि जातीची आता या 21 व्य शतकात काहीच गरज नाही.कारण ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान शोध एव्हढे अँडव्हान्स झाले आहे,की,आता कोणत्याही आश्चर्याबद्दल अंधश्रद्धा बाळगायची गरज नाही.जिथे जे काही घडते,किंवा जे काही आहे,त्याला कारण आहे.या ‘ कार्यकारण सिद्धांताचा ” शोध लागला आहे.या सिद्धांताच्या आधारे , आता आपणास कोणत्याही गोष्टीचे ,घटनेचे कारण शोधता येते.एव्हडी माणसाची बुद्धी प्रगल्भ झाली आहे.
‘ शोध घेण्याचा, सत्य शोधण्याचा ‘ हा माझा प्रवास सुरू झाला, मग मी विचार करायला लागलो की, माणसाच्या जीवनाची आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक अशी पाच अंगे आहेत, या प्रत्येक क्षेत्रात माणूस काही ना काही धडपड प्रयत्न करीत असतो त्याचे कारण म्हणजे आपले जीवन सुखी समाधानी आनंदी आणि शांतीमय होण्यासाठी. माणसाच्या जीवनाचे ध्येय म्हणजे ह्या चार गोष्टीचा आहेत. भौतिक सुखासाठी माणूस धनसंपत्ती साठी चार पैसे मिळवण्यात ही आयुष्यभर धडपड करत असतो, हे त्याचे आर्थिक जीवन होय, माणसाचा त्याचे कुटुंब जात धर्म गाव देश याच्याशी संबंध येतो, म्हणून तो या विषयातही अनेक संघर्ष करीत असतो. यास सामाजिक जीवन आणि सामाजिक जीवनातील माणसात संघर्ष असे म्हणावे लागेल. याचबरोबर माणसाच्या भौतिक आणि मानसिक ज्या समस्या आहेत किंवा निर्माण होतात त्याला कारण म्हणजे राजकारण आणि सत्ता हे आहे. कारण माणसाची आर्थिक परिस्थिती जशी आहे त्यानुसार त्याला आपले जीवन जगावे लागते, आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये जे काही प्रश्न निर्माण होतात उदाहरणार्थ बेकारी महागाई भ्रष्टाचार अन्याय अत्याचार काळाबाजार नफेखोरी नशाबाजी जाती धर्माची भांडणे या सर्व गोष्टीला जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला सामोरे जावे लागते नव्हे याची जे दुष्परिणाम होतात ते त्यास भोगावे लागतात, हे जे दुष्परिणाम निर्माण झाले त्याचे मूळ हे राजकारणात आणि सत्तेत असते. कारण राजकारण हे किती शुद्ध आणि अशुद्ध यावर सत्ता ही किती आणि अशुद्ध यावर अवलंबून असते, सत्तेत दुर्गुणी विषमतावादी दृष्ट माणसे जाऊन बसली तर सत्ता बिघडते, सत्ता बिघडली की, राजकारण बिघडते, राजकारण बिघडले की, अर्थकारण आणि समाजकारण बिघडते, एवढेच नाही तर धर्मकारण पण बिघडते, आर्थिक सामाजिक राजकीय धर्म या गोष्टीचा परिणाम माणसांच्या संस्कारावर होतो, माणसे सुसंस्कारी बनण्याऐवजी दुराचारी बनतात, समाज बिघडतो, देश बिघडतो, आणि सगळी कडे अनागोंदी सुरू होते. यात लहान निष्पाप बालके, वृद्ध माणसे, स्त्रिया यांचा बळी जातो. आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल आहेत त्यांचा पण बळी जातो. असे का घडते? याला कारण ‘ व्यवस्था ‘ आहे. आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक व्यवस्था ही विषमतेवर आधारलेले असेल तर अशा व्यवस्थेत माणसाला बरबाद करणाऱ्या अशा अनेक गोष्टी निर्माण होतात. आणि समतेची व्यवस्था असेल तर त्यात माणसाचे उत्थान होते. अशा व्यवस्थेतच माणसाच्या जीवनाचे जे मुख्य चार उद्दिष्टे आहेत, ती म्हणजे सुख शांती समाधान आणि आनंद ही चार उद्दिष्टे पूर्ण व्हायला समतेची व्यवस्थाच उपयोगी असते. विषमतेची व्यवस्था बदलण्यासाठी आणि समतेची व्यवस्था आणण्यासाठी, समतावादी विचारांचे लोक तयार व्हावे लागतात, आणि त्यांच्या नेतृत्वात लोकशाहीच्या मार्गाने क्रांती करावी लागते, लोकशाही म्हणजे ‘ विचार बदलणे होय.’विचार बदला म्हणजे तुम्ही बदलाल, तुम्ही बदलाल म्हणजेच व्यवस्था बदलेल ‘ . विषमतावादी विचार बदलून देशातील किंवा जगातील सारे लोक किंवा जास्तीत जास्त लोक म्हणजे बहुमत हे जर समतावादी विचाराचे झाले तर, लोकशाहीच्या मार्गाने समताधिष्ठित समाज रचना स्थापन व्हायला वेळ लागत नाही, फक्त विचार बदलायला मात्र वेळ लागतो, एकदा का विचार बदलला, तर मग व्यवस्था बदलायला पण वेळ लागत नाही. लोकशाहीचा मार्ग म्हणजे संविधानात्मक मार्ग, कायद्याचा मार्ग, आयुष्याचा मार्ग होय. या लोकशाही मार्गाने म्हणजेच मतदानाच्या मार्गाने जर विषमतावादी व्यवस्था बदलणार नसेल तर समतावादी विचाराचे लोक क्रांती करणारच, कारण त्याशिवाय पर्यायच नसतो. हा जगाचा इतिहास आहे. विषमतावादी आणि समतावादी हा एक प्रदीर्घ लढा आहे, एक जागतिक लढाई आहे, आणि व्यवस्था बदलल्याशिवाय ती थांबत नाही. आणि जरी व्यवस्था बदलली तरी थांबत नाही. कारण भौतिक व्यवस्था बदलली म्हणजे मानसिक बदल होतोच असं नाही, कारण स्वार्थ आणि परमार्थ या दोन विचाराचे मेंदूत अधिष्ठान आहे. म्हणून या दोन विचारातील संघर्ष यात ज्याचा विजय होतो त्याची जी व्यवस्था असते, आणि जी व्यवस्था असते ती टिकवून ठेवण्याची कला तंत्र मंत्र विचार यात किती शक्ती असते यावर ती व्यवस्था टिकत असते. अर्थात विषमतावादी व्यवस्थेत जर या व्यवस्थेची यंत्र तंत्र मंत्र ही शक्ती मोठी असेल यापुढे क्षमतावादी शक्ती टिकाव धरू शकत नसेल तर विषमतावादी व्यवस्थाच कायम राहील, आणि जर समता वादी व्यवस्था स्थापन झाली आणि त्याच त्या व्यवस्थेचे तंत्र मंत्र यंत्र विचार या हे जर मजबूत असतील यात शक्ती असेल हे एवढे शक्तिशाली तेवढी ती सत्ता तेवढे वर्ष कायम असेल आणि समतावादी विचार तंत्र मंत्र यंत्र जर दुर्बल होत गेले तर परत विषमता वाद्यांचे फावल्या जाईल.
जगातील महामानवाने जगात म्हणजे प्रत्येकाने आपापल्या देशात सामाजिक समता आणण्यासाठी प्रयत्न केले अजूनही करीत आहेत, तसेच जगात कम्युनिस्ट पक्ष हा आर्थिक समता आणण्यासाठी प्रयत्न केले काही देशात ती व्यवस्था आली परंतु विषमतावादी शक्ती जगात मोठी असल्यामुळे या विषमतावादी शक्ती पुढे समतावादी शक्ती कमी पडली म्हणून चीन रशिया कंबोडिया व्हिएतना अशा देशात क्रांती होऊन समता स्थापण्याची तयारी चालू होती यास जगातील विषमतावादी म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विषमतावादी म्हणजेच भांडवलदार आणि मनुवादी यांनी एक मत करून एकजूट करून हा समतेचा प्रयोग नष्ट केला, तरी परंतु जोपर्यंत समतावादी व्यवस्था या जगात स्थापन होणार नाही, तोपर्यंत क्षमतावादी विचाराचे लोक गप्प बसणारच नाहीत. कारण शेवटी विषमते विरुद्ध समता आणि समते विरुद्ध विषमता हा संघर्ष आहे. माझ्या विचाराचा प्रवास हा मी आपल्यापुढे ठेवला.
पुरोगामी प्रतिगामी, परिवर्तनवादी आणि स्थितीवादी, विषमतावादी आणि समतावादी, विश्वशांती वादी आणि विश्व अशांती वादी, असा हा विचाराचा लढा चालू आहे, चालतच राहणार आहे, यास कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. याबरोबरच मनामनाची पण लढाई चालूच असते, जशी की, सद्गुनी आणि दुर्गुणी, विकृती आणि संस्कृती, शंकुचित मन आणि व्यापक मन, दया क्षमा शांती ची प्रवृत्ती आणि निर्दयी दुष्ट कपटी दुराचारी विध्वंस करी, अशा दोन्हीही प्रवृत्तीचे स्वभावाचे विचाराची लोक या जगात प्रत्येक देशात प्रत्येक प्रदेशात आणि प्रत्येक गावात आणि प्रत्येक कुटुंबात वास्तव्यास आहेत.
शेवटी सत्य आणि असत्याची ही लढाई आहे, या लढाईत सत्याचा विजय झाला तर क्षमतावादी व्यवस्था स्थापन होईल. समतावादी व्यवस्था म्हणजेच स्वातंत्र्य समानता बंधुता न्याय समाजवाद सर्वधर्मसमभाव नागरिकांचे सार्वभौमत्व लोकशाही होय. या विचाराचे लोक एकत्र येणे संघटित होणे पक्ष स्थापन करून सत्तेत जाणे आणि समतावादी समाज रचना स्थापन करणे हे महत्त्वाचे आहे, याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आत्मघातकीपणाच होय, आपल्या पायावर आपल्याच हाताने धोंडा मारून घेणे होय, आपल्याच हाताने आपला जीव घेणे होय, म्हणजेच आत्महत्या करणे होय.
माणूस जन्माला येतो तो अमर होऊन राहत नाही तर तो मरण्यासाठीच जन्माला येत असतो, माणसाचा जन्म म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे, फुगा आहे, तो कधी फुटणार आज उद्या की आत्ताच याचा भरवसा नाही, एक ना एक दिवस माणूस मरणारच आहे याची गॅरंटी प्रत्येकाला आहेच, असे असताना उद्या मेलो काय किंवा आज मेलो काय ? यात फरक काय ? असा विचार करून तळहातीशीर धरून हिम्मत करून समतेची ही लढाई लढण्यास सज्ज झाले पाहिजे. तरच बहुजनांचे भवितव्य साबूत राहील, अन्यथा अल्पजन मजेत जिंदगी जगत आहेत, ते तीच जिंदगी जगतील, आणि शारीरिक आणि बौद्धिक श्रम करणारे हे कष्टमय त्रासदायक जिंदगी जगत राहतील, जसे आज जगत आहेत.
लेखक : दत्ता तुमवाड.
सत्यशोधक समाज नांदेड.
दिनांक : 4 नोव्हेंबर 2025. फोन: 9420912209.



