उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक…
आंदोलन सुरु असताना शेतकऱ्यांच्या मनावर व एकशक्तीवर पहिला अयशस्वी हातोडा मारला असेल तर तो महाराष्ट्र सरकारनी.पण शेतकऱ्यांच्या मनावर आघात करणारा हातोडा किती वजनदार आहे हे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी वेळीच ओळखले व नियोजन,कृती,कर्तव्य या कसोटीत ते बेदाग खरे उतरले…
बोलणे,बोलण्यानुसार कृती करणे व कर्तव्य पार पाडणे,यासाठी विपरीत परिस्थितीत श्रम घेण्याची मानसिकता असणे आवश्यक असते.
श्रम घेण्याची मानसिकता असेल तर अक्कल पणाला लावून क्षमतेच्या कसोटीवर ध्येय गाठण्यासाठी पराकाष्ठा करावी लागते,हे प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे.
पराकाष्ठाचे नियोजन,त्यानुसार कृती करताना आणि कर्तव्य पार पाडतांना सर्वांना झेलाव लागतय.कोण काय बोलणार आणि कसे बोलणार याचा नेम राहात नाही.बोलणाऱ्यांचे सगळे शब्द ऐकताना नेतृत्वाच्या मनावर मोठ्या प्रमाणात दबाव येतोय.
या दबावाला जो नाकारतो तोच शेतकऱ्यांचे यशस्वी नेतृत्व करु शकतो हे निख्खळ सत्य आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांना स्वतःचे सर्वस्व गमावून बसाव लागतय.घरातील सदस्यांवर दुर्लक्ष करावे लागतय.तद्वतच त्यांच्या भविष्यावर कधीकाळी पाणी फेराव लागतय…
वेळ देणे आणि वेळ काढणे जिकरीचे कर्तव्य आहे.सत्ता,पद,पैसा,यासाठी याकाळात कोणीही पुढे येणार!,पण शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वस्वपणाला लावणारे मोजकेच नेते असतात,हे आवर्जून लाक्षात घेतले पाहिजे…
माजी राज्यमंत्री बच्चू कडू,माजी आमदार अँड.वामनराव चटप,माजी खासदार राजू शेट्टी,माजी मंत्री महादेव जानकर,किसान सभेचे पदाधिकारी अजीत नवले,रविकांत तुपकर,नितेश कराळे मास्तर आणि शेतकरी यांनी स्वतःला पणाला लावले व महाराष्ट्र सरकारला बोलते केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा शेतकरी आंदोलकांना महामार्गावरुन हटविण्याचा जो आदेश आला होता,तो आदेश गंभीर होता.
या आदेशाला मान्य करीत बच्चू कडू यांनी जी सतर्कता दाखवली ती खरोखरच गंभीरपणे विचारात घेणारी होती.न घबरता,न डगमगता त्यांनी लाखो शेतकऱ्यांसह स्वतःला अटक करुन घेण्यासाठी पोलिस स्टेशनकडे पाय वळवले.
हि घटना इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या माध्यमातून जेव्हा जगभर पसरली तेव्हा कुठे असंवेदनशील महाराष्ट्र सरकार खडबडून जागे झाले होते.हा गंभीर घटनाक्रम कधीच विसरता येत नाही.
प्रसंगावधान माजी राज्यमंत्री बच्चू कडू,माजी आमदार अँड वामनराव चटप,माजी मंत्री महादेव जानकर,माजी खासदार राजू शेट्टी,किसान सभेचे अजीत नवले,रवीकांत तुपकर यांनी घेतलेला निर्णय हा समयसूचकता नुसार आहे.
परंतु महाराष्ट्र सरकार ने शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ केले नाही तर हे सरकार बेईमान आहे हे शेतकऱ्यांनी ठामपणे ठरवले पाहिजे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करण्याचे शब्द पाळले पाहिजे आणि आपले योग्य कर्म केले पाहिजे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करण्याचे शब्द पाळत नसतील तर ते महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी बेईमानच!



