युवराज डोंगरे
उपसंपादक
येणाऱ्या काही दिवसातच जि .प व पं. स. निवडणूका होणार असून दर्यापूर तालुक्यातील खल्लार जि. प. सर्कलमधून सौ ममता सुरेश कुऱ्हाडे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी खल्लार परिसरातील नागरिकांनी खासदार बळवंत वानखडे व दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांच्याकडे केली आहे.
खल्लार जि. प. सर्कल हे अनुसूचित जाती महिलांकरीता राखीव असून सर्कलमधिल नागरिकांची सौ ममता कुऱ्हाडे यांना पसंती आहे. सौ. ममता कुऱ्हाडे ह्या सुरेश कुऱ्हाडे यांच्या पत्नी आहेत सुरेश कुऱ्हाडे हे गेल्या 17 वर्षापासून खल्लार सर्कल मधिल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कार्यरत असून त्यांचा मतदारांसोबत दांडगा परिचय आहे.
खल्लार परिसरातील सर्वांशी सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यांची काम करण्याची पद्धत व वागणूक त्यांच्या परिचयाचे गमक आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी स्थलांतरित उमेदवार पेक्षा सौ.ममता सुरेश कुऱ्हाडे सारख्या काँग्रेस पक्षा सोबत एकनिष्ठ व निष्ठावंत महिलेला उमेदवारी द्यावी अशी मागणी खल्लार सर्कल मधिल सर्व काँग्रेस पदाधिकारी व मतदारांनी केली असून सौ ममता सुरेश कुऱ्हाडे यांना उमेदवारी दिल्यास काँग्रेस पक्षाचा खल्लार जि. प. सर्कलमधून विजय निश्चित आहे.



