बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
इंदापूर येथील प्रशासकीय कार्यालयाच्या प्रांगणात दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्फत कृषी यांत्रिकी करण योजने अंतर्गत 51 अनुदानित ट्रॅक्टर आणि 8 यंत्र अवजारांचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बोलत असताना म्हणाले की,आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान व ट्रॅक्टर यांत्रिक पद्धतीने शेती व्यवसाय करावा, व चांगले पिक पैदा करून जास्तीत जास्त उत्पन्नात वाढ करावी. आपला वाढपी घरचाच आसल्यामुळे शेतकऱ्यानी जास्तीत जास्त इंदापूर तालुक्यात लाभ घ्यावा,कृषी यांत्रिकी वितरण प्रसंगी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे उदगार…
इंदापूर तालुक्यातील एकूण 23 हजार 597 लाभार्थी शेतकऱ्यांची निवड या योजने अंतर्गत करण्यात आली. त्यापैकी 9821 लाभार्थी ट्रॅक्टर साठी निवडले गेले आहेत. तालुक्यातील 1003 लाभार्थ्यांनी ट्रॅक्टर साठी कागदपत्रे अपलोड केली होती तर 326 लाभार्थ्यांना पूर्व समती दिली असून त्यापैकी 51 लाभार्थ्यांना अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले आहे . एकूण 13776 लाभार्थ्यांची यंत्र अवजारांसाठी पात्र असून 51 ट्रॅक्टर संचलित 8 अवजारांचे वितरणही करण्यात आले.
प्रथम त्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व यंत्र अवजारे वितरण पूर्ण झाले.तर उर्वरित लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या वेळेनुसार टप्प्यात टप्प्याने ट्रॅक्टर व यंत्र आणि अवजारांचे वाटप करण्यात येईल या वितरण सोहळ्या निमित्त…
प्रमुख उपस्थिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे , तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे,तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, मा. जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे सर, ज्येष्ठ नेते दत्तामामा घोगरे, संचालक श्रीकांत बोडके, माजी सरपंच नरहरी काळे, सरपंच दादासाहेब क्षीरसागर, सरपंच उस्मान शेख,सरपंच नितीन सरवदे, उप सरपंच संतोष सुतार,मा.सरपंच जगदीश सुतार, सरपंच सोमनाथ मोहिते, सरपंच पांडुरंग डीसले, सरपंच सुनील जगताप,, तालुका पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे सह सर्व तालुक्यातुन आलेले आजी माजी सरपंच उपसरपंच मान्यवर, शेतकरी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



