प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” असे आहे,ज्याचा अर्थ “सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे” असा आहे.
“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्या कार्याचे प्रतीक आहे.
याचा अर्थ असा आहे की पोलीस हे सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांना किंवा वाईट लोकांना नियंत्रित करण्यासाठी कटिबद्ध आहेत.
इंग्रजीमध्ये तथा काही देशांमध्ये,जसे की अमेरिकेत,’To protect and to serve’ (संरक्षण करणे आणि सेवा करणे) हे ब्रीदवाक्य वापरले जाते.
महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद पोलीस महासंचालक (DGP) हे आहे.हे पद राज्याच्या पोलीस यंत्रणेचे प्रमुख असते आणि ते भारतीय पोलीस दलातील सर्वोच्च पदांपैकी एक आहे.
यामुळे महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालकांनी,”महाराष्ट्र राज्यातील पोलिस जबाबदारीने वागतात काय? जनतेचे संरक्षण भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून करतात काय? याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे.
याचबरोबर धर्माच्या आडून किंवा जातीच्या आडून,महाराष्ट्र राज्यातील पोलिस अधिकारी हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनधिकृत आर.एस.एस.सारख्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी मनमानी पद्धतीने कर्तव्य पार पाडत असतील तर अशा अधिकाऱ्यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ केले पाहिजे…
तद्वतच शाळा-महाविद्यालयाच्या गेट पुढेच,आर.एस.एस.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेची सदस्य नोंदणी करणे हे गैर जिम्मेदार कार्यपद्धत आहे,म्हणजेच कायद्याला अनुसरून अजिबात नाही…
ज्या आर.एस.एस.संघटनेची धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयात कायदेशीर नोंदणी नाही किंवा संबंधित इतर कुठल्याही कार्यालयात सदर संघटना नोंदणीकृत नाही,अशा संघटनेची सदस्य नोंदणी महाविद्यालयाच्या गेटच्या पुढे कोणत्या अधिकारांनी,ते करीत होते? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
संभाजीनगर (औरंगाबाद) येथील एका महाविद्यालयापुढे बेकायदेशीर सदस्य नोंदणी करणाऱ्या आर.एस.एस.च्या पदाधिकाऱ्यांवर किंवा सदस्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे सोडून,संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतःहून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर कलमातंर्गत गुन्हा दाखल करणे कोणत्या कायद्यात आणि कोणत्या कर्तव्यात बसते आहे?हा महत्वपूर्ण प्रश्न महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांना आहे…
महाविद्यालयापुढे आर.एस.एस.ची सदस्य नोंदणी करण्यास हरकत घेणे हा कायदेशीर भाग आहे.कारण कुठल्याही शाळा-महाविद्यालयाच्या गेट पुढे कुठल्याही संघटनेला सदस्य नोंदणी करता येत नाही.
मग? महाविद्यालयीच्या गेट पुढील आर.एस.एस.च्या सदस्य नोंदणीला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कायदेशीर हरकत घेतली म्हणून गुन्हा केलाय का?उलट कायद्यानुसार कर्तव्य पार पाडले व शांतता भंग होणार नाही याची खबरदारी घेतली.
ज्या शाळा-महाविद्यालयांना शासनाच्या तिजोरीतून १०० टक्के अनुदान मिळतय त्या शाळा-महाविद्यालयाच्या ठिकाणी किंवा गेटच्या पुढे कोणत्याही धर्माला वाव दिला जात नाही किंवा कोणत्याही धर्माचा प्रचार व प्रसार करता येत नाही.ही साधी बाब वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणाऱ्या औरंगाबादच्या सदर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना,पोलिस स्टेशन प्रमुखांना कळत नाही काय?
“आजपर्यंतचा इतिहास आहे,आर.एस.एस.या संघटनेंनी कुठल्याच ओबीसी,एससी,एसटी अल्पसंख्याक,विमुक्त भटक्या जाती जमाती,विशेष मागासवर्गीय,यांचे कधीच भले केले नाही किंवा यांच्या हितासाठी कुठेच संघर्ष केला नाही,यांच्या उन्नतीसाठी कुठेच आंदोलन केली नाहीत.
याचबरोबर आर.एस.एस.नी भारतीय संविधानाच्या अंतर्गत या देशातील नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कधीच कार्य केलेली दिसत नाही.उलट त्यांना त्यांचे हक्क मिळू नये म्हणून भारतीय संविधानाचा आर.एस.एस.नी व त्यांच्या पिलावळ संघटनांनी विरोध केला,आरक्षणाचा म्हणजे देशातील ओबीसी,एससी,एसटी,अल्पसंख्याक,विमुक्त भटक्या जाती जमाती,विशेष मागासवर्गीय नागरिकांच्या हक्कांचा विरोध केला असल्याचे अनेक उदाहरणे आहेत..
हिंदू म्हणजे नक्की काय?व हिंदूची सभ्यता म्हणजे नेमकी काय?याची उत्तरे आर.एस.एस.कडे व त्यांच्या पिलावळ संघटनांकडे नाहीत.हिंदू हा शब्द कुठल्या देशातला आहे हे सुद्धा ते सांगत नाही.हिंदू हा शब्द परकीय असेल तर यांना हा परकिय शब्द धर्म म्हणून आणि सामाजिक सभ्यता म्हणून चालतोय कसा?हा गहन व गंभीर मुद्दा आहे…
(हिंदू या शब्दाचा संदर्भवार खुलासा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी अनेकदा केला आहे.त्यांच्या हिंदू या शब्दाला अनुसरून प्रश्नाचे उत्तर आर.एस.एस.प्रमुख मोहन भागवतांनी व इतर कोणीही देऊ शकली नाहीत.)
“हिंदू धर्म नाही,हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असताना,हे हिंदू धर्म असल्याचे या देशातील भोळ्याभाबड्या जनतेला वारंवार का म्हणून सांगतात?हा प्रश्न सुध्दा भयंकर गंभीर आहे…
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर एका पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतःहून अकारण गुन्हा दाखल करणारे संभाजी नगर (औरंगाबाद) येथील प्रकरण अतिशय गंभीर व संतापजनक आहे.
या बेकायदेशीर व गैर प्रकरणाची दखल जनतेंनी स्वतः घेतली असून २४ आक्टोंबर २०२५ रोज शुक्रवारला वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली महा-जनआक्रोश मोर्चा औरंगाबाद येथील क्रांती चौकातून निघणार आहे व आर.एस.एस.च्या कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती आहे..
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर हे महा-जनआक्रोश मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.त्यांनी आधिच स्पष्ट केले आहे की,”औरंगाबाद पोलिसांनी आर.एस.एस.संघटनेचे नोंदणीकृत प्रमाणपत्र द्यावे किंवा सदर संघटना बेकायदेशीर असल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी…
औरंगाबाद येथील महा-जनआक्रोश मोर्चाची धास्ती महाराष्ट्र पोलीसांनी घेतली असली तरी,त्यांच्यावर आर.एस.एस.संघटनेचे नोंदणीकृत प्रमाणपत्र देण्याची कायदेशीर जबाबदारी,वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर आणली आहे.
तद्वतच ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर गैर मानसिकता द्वारे गुन्हे दाखल केले ते गुन्हे कमी करण्याची वेळ पोलिस विभागावर येणार आहे आणि संबंधित बेजबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर व महाविद्यालयापुढे आर.एस.एस.ची नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची वेळ सुध्दा येणार आहे….



