Home देशविदेश RSS ( संविधान विरोधी शक्तीच्या ) च्या विरोधात औरंगाबाद येथे जनआक्रोश मोर्चा…. ...

RSS ( संविधान विरोधी शक्तीच्या ) च्या विरोधात औरंगाबाद येथे जनआक्रोश मोर्चा….     

    शाळा,महाविद्यालय,विद्यापीठ परिसराच्या भोवताली 100 मीटर परिसरात कोणत्याही मादक पदार्थाच्या विक्री व प्राशनाला प्रतिबंध!

         आणि विशेष म्हणजे मादक पदार्थापेक्षाही ( तंबाखू , बीडी, सिगारेट, बियर, दारू, अफू, गांजा, चरस, केमिकल ड्रग्स इ. ) कित्येक पटीने घातक असलेल्या केवळ एका रात्री पुरत्या मर्यादित नशेपेक्षा सर्व पिढ्यानं पिढ्या बरबाद करणाऱ्या,सर्व भेदाच्या भिंती निर्माण करणाऱ्या,नशांचा माउंट एव्हरेस्ट निर्माण करणाऱ्या…..

        RSS ला सदस्य नोंदणीसाठी शाळा,महाविद्यालय परिसराच्या 100 मीटर परिसरात कुणी अधिकार दिले?

        अरे स्वतःचीच धर्मादाय आयुक्त कार्यालयात कोणतीही NGO म्हणून नोंदणी नाही. तीला कोणता अधिकार सदस्य नोंदणीचा अधिकार पोहोचतो?

          कोणत्याही शाळा,महाविद्यालय,विद्यापीठ यांना शासनाच्या तिजोरीतून 100% अनुदान मिळते, त्या ठिकाणी कोणत्याही धर्माचे शिक्षण देता येत नाही. तिथे केवळ विज्ञानवाद + विवेकवाद = मानवतावाद आणि अभ्यासक्रमच शिकविल्या जातो. या व्यतिरिक्त कोणतेही शिक्षण देणे हे संविधानाचे उल्लंघन आहे.

        हे ठाऊक असताना सुद्धा,ही नोंदणी करत असताना आमचे संविधाननिष्ठ दबंग कार्यकर्ते…..

       आदरणीय विजय वाहूळ आणि

  आदरणीय राहुल मकासरे यांनी या सदस्य नोंदणीला विरोध करून त्यांना गाशा गुंडाळायला भाग पाडले….

      तर उलट कुणीही फिर्यादी नसताना पोलिसांनीच स्वतः होऊन दखल घेऊन या दोघांवर गुन्हा दाखल केला!

       अशी दखल खैरलांजी प्रकरणात भोतमांगे परिवाराच्या बाबतीत पोलिसांनी घेतली असती तर आम्हांला न्याय मिळाला असता.

     म्हणजे या राज्याचे EVM मुख्यमंत्री,गृहमंत्री असलेले RSS चे शिलेदार म्हणजे….

       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पोलिसांना बळ दिल्यामुळे हे सर्व घडले आहे.

      “अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो.:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर..

म्हणूनच…….

      वंचित बहुजन आघाडीतर्फे,RSS च्या औरंगाबाद येथील कार्यालयावर…..

      जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.तेंव्हा लाखोंच्या संख्येने या मोर्चात सामील होऊया….

कारण…….

   असतील जरी आमुचे,मतभेद आपसाचे,संविधानाच्या नावावर करू बलिदान जीवाचे….

      यासाठी “आम्ही भारताचे लोक ” कोणताही भेद करणार नाही….

म्हणूनच…..

    दिनांक 24 आक्टोबर शुक्रवारी सकाळी 11 वाजता क्रांती चौक इथून हा मोर्चा RSS च्या कार्यालयावर धडकेल.

       आणि संविधाननिष्ठ जबाबदार नागरिक जिवंत असल्याचे पुरावे देऊया…..

          आवाहनकर्ता

          अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689…