Home Political आळंदी नगरपरिषदेत नव्या पिढीचा शिरकाव; प्रभाग ५ मधून रोहन नंदकुमार कुऱ्हाडे मैदानात.....

आळंदी नगरपरिषदेत नव्या पिढीचा शिरकाव; प्रभाग ५ मधून रोहन नंदकुमार कुऱ्हाडे मैदानात.. — राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारीची तयारी…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी :– नगरपरिषदेच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना प्रभाग क्रमांक ५ मधून रोहन नंदकुमार कुऱ्हाडे यांनी राजकीय रिंगणात उतरायची तयारी केली आहे. माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे यांचे चिरंजीव असलेले रोहन कुऱ्हाडे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून इच्छुक असून, स्थानिक राजकारणात नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून पुढे येत आहेत.

           रोहन कुऱ्हाडे हे ‘शिवस्मृती प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आळंदीत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. शहरातील स्वच्छता, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत यासारख्या अनेक उपक्रमांमुळे त्यांनी नागरिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक कार्यातून राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या या तरुण नेतृत्वाकडून प्रभागात नवी ऊर्जा आणि विकासाची दिशा अपेक्षित आहे.

           प्रभाग ५ मधील नागरिकांच्या अडचणींवर प्रत्यक्ष संवाद साधत, मूलभूत सुविधांचा विकास व पारदर्शक प्रशासन देण्याचा संकल्प रोहन कुऱ्हाडे यांनी व्यक्त केला आहे. युवकवर्गाचा मोठा पाठिंबा आणि वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास मिळाल्याने त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

            “आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी मी सदैव तयार आहे. तरुण पिढीच्या बळावर विकासाचे नवे पर्व घडवू,” असे रोहन कुऱ्हाडे यांनी सांगितले. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग ५ मध्ये उत्सुकता आणि रंगत वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.