Home Maharashtra शेतकरी व निराधारांना महाराष्ट्र सरकारचा दणका..‌. — रुपये मिळालेच नाही..‌ ...

शेतकरी व निराधारांना महाराष्ट्र सरकारचा दणका..‌. — रुपये मिळालेच नाही..‌ — सामाजिक कार्यकर्ते शुभम गजभिये म्हणतात महाराष्ट्र सरकार निष्क्रिय,असंवेदनशील व निष्ठूर!…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

        महाराष्ट्र सरकार म्हणजे बेताल सरकार?”कुणाचा पायपोस कुणात नाही! तद्वतच बोललेल्या शब्दाला न जागणारे सरकार!. एवढे असंवेदनशील सरकार महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना व निराधारांना कधीच बघायला मिळाले नाही..

        अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीची भरपाई सर्व शेतकऱ्यांना दिवाळी पुर्व आर्थिक स्वरूपात दिली जाईल म्हणणाऱ्या महाराष्ट्र सरकारने स्वत:च्याच बोललेल्या शब्दावर पाणी फिरवीले आणि उघड माथ्याने आम्ही शेतकऱ्यांचे हितचिंतक नाही असे अधोरेखित केले.

       भाजपाचे व मित्र पक्षांचे सरकार जेव्हा महाराष्ट्र राज्यात येतय तेव्हा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव दिला जात नाही,शेतमालांचा भाव जाणिवपूर्वक पाडला जातो हे कटू सत्य आहे.आजच्या स्थितीत कापसाला ६ हजार ते ७ हजार प्रती क्विंटल भाव मिळतो आहे तर सोयाबीनला ३ हजार २०० ते ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे.याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ८ रुपये किलो प्रमाणे भाव मिळतो आहे.

           काँग्रेस मित्र पक्षाच्या काळात कापसाला १३ ते १४ हजार रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळाला होता तर सोयाबीनला ७ ते ८ हजार प्रती क्विंटल भाव दिला जात होता.याचबरोबर कांदा उत्पादकांना २५ ते ४० रुपये प्रति किलो भाव दिला होता.

         याचबरोबर संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मासीक अनुदान,निराधार लाभार्थ्यांना दिवाळी पुर्व दिला गेला नसल्याने त्यांना परेशान करण्याचे काम महाराष्ट्र सरकार करीत आहे.गरीब निराधारांना केंद्र सरकारद्वारे आधार देण्याचे काम केले जात असले तरी निराधारांना दरमहा मानधन मिळत नसल्याने त्यांची महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून पिळवणूक करणे सुरू झाले असल्याचे दिसून येते आहे.

            चिमूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शुभम गजभिये यांचे म्हणणे आहे की महाराष्ट्र सरकार हे बोलल्या प्रमाणे वागत नसल्याने शेतकऱ्यांना व निराधारांना हुलकावणी देण्याचे काम करीत आहे.यामुळे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या व निराधारांच्या बाबतीत असंवेदनशील,निष्क्रिय,निष्ठूर असल्याचे दिसून येते आहे…

          महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्यांच्या व निराधारांच्या बाबतीत,”आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नसल्याने,त्यांच्या हितासाठी वेळेवर निर्णय घेताना दिसत नाही व वेळेवर मदत करताना दिसत नाही असे शेतकरी व निराधारांचे म्हणणे आहे…