Home Crime साकोली नगरपरिषद भ्रष्टाचाराची चौकशी होणार मुंबई मंत्रालयातून?  — पत्रकार व जनतेचे...

साकोली नगरपरिषद भ्रष्टाचाराची चौकशी होणार मुंबई मंत्रालयातून?  — पत्रकार व जनतेचे अप्पर मुख्य सचिवांना चौकशीचे पत्र… — अन्यथा मुंबईत उपोषण करण्याचा इशारा… 

निलय झोडे 

 उपसंपादक 

दखल न्यूज भारत 

साकोली / मुंबई : साकोली सेंदूरवाफा नगरपरिषदला सन २०१७ ते २०२२ या काळात एकुण किती करोड रुपये विकास निधी नगरविकास विभाग मंत्रालयाने दिला व त्या निधीच्या माध्यमातून काय विकास करण्यात आला,याबाबत सविस्तर चौकशी करावी,अशा आशयाचे पत्र नगर विकास विभागाला पाठविण्यात आले आहे. 

          कारण येथे विकासाचा पत्ता नाही.मग कोट्यवधी रुपये अखेर गेले कुठे? यासंबधाने पारदर्शक तथा उच्च स्तरीय चौकशी करण्याच्या व दोषींवर कारवाई करण्याबाबत साकोलीचे पत्रकार थेट मुंबई मंत्रालयात गेले. 

        नगरविकास विभाग मुख्य अप्पर सचिव डॉ. के. एच. गोविंदराज ( भाप्रसे ) नगरविकास विभाग मंत्रालय यांना ( गुरू. ०९ ऑक्टों.) ला चौकशीसाठी पत्र देऊन आले.

          तक्रार पत्रात नमूद करण्यात आले आहे की तातडीने चौकशी करावे.चौकशी न केल्यास थेट मुंबईत उपोषण करण्याचा आशिष चेडगे यांनी इशारा दिला आहे. 

        ब्रिटीशकालीन राजवटीच्या काळातील मुख्य ऐतिहासिक प्राचीन तहसील साकोलीला प्रथमच २०१६ मध्ये नगरपरिषदेचा बहुमान मिळाला.

        २०१७ ला कार्य सुद्धा सुरू झाले.परंतू निवडणुकीत सत्ताधारी लोकांनी येथील सामान्य जनतेला “आम्ही स्मार्ट शहर” बनवू असे १२ विकासाचा जाहिरनामा वाटून जनतेचा मूर्ख बनवून मतदार जनतेची फसवणूक करण्यात आली.

        येथे आतापर्यंत कोट्यवधी रुपये येऊनही साधे मुत्रीघर बांधू शकले नाही मग संपूर्ण पैसा गेला कुठे?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

         यावर साकोली नगरपरिषद जि.भंडारा येथे सन २०१७ पासून एकुण किती विकास निधी देण्यान आला व त्या निधी अंतर्गत कोणता विकास केला याची उच्च स्तरीय चौकशी करण्याबाबत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा अध्यक्ष पत्रकार आशिष चेडगे यांनी थेट मुंबई मंत्रालयात चौकशी पत्र लावले आहे. 

       यात नमूद केले आहे की,इंग्रजकालीन काळापासुन ऐतिहासिक तहसिल साकोलीला प्रथमच २०१६ ला नगरपरिषद” हा मान मिळाला.सन २०१६ ला डिसेंबर मध्ये,निवडणूकही संपन्न झाली.

      येथे सन २०१७ पासुन मुख्याधिकारी राहूल परिहार यांच्या काळापासून एकुण विविध योजनेत एकंदर आपणा तर्फे किती कोटींचा विकासनिधी मंजुर करण्यात आला.

      कारण प्रत्येक जनता आज पत्रकारांना विचारत आहे,की विकासमिधी आलाच नाही का?साकोली येथे नगरपरिषद काळात एकही शौचालय काय तर साधे मुत्रीघर बांधू शकले नाही. 

        मग हा आलेल्या सर्व निधी सन २०१७,२०१८,२०१९ (कोविड-१९) वगळता २०२१, २०२२ मधील आलेला सर्व विकासनिधींचे पैसे अखेर गेले कुठे? कि आजही साकोली सेंदूरवाफा शहर पूर्वी ग्रा.पं. काळात होते,आजही त्याच अवस्थेत दिसत आहे. 

       येथील नगर परिषद २०१७ ते २०२२ पर्यंत एकुण आपल्या विभागामार्फत किती कोटींचा निधी मंजुर करून खात्यात वळता झाला व त्या पैशांचे अखेर केले काय?

      विकास निधीची तातडीने चौकशी करावी,अन्यथा मुंबईत आमरण उपोषणाचा मार्ग स्विकाण्यासाठी भाग पाडू नये.असे पत्र आशिष चेडगे यांनी नगरविकास विभाग मंत्रालय,मुंबई अप्पर मुख्य सचिव डॉ.एच.के.गोविंदराज यांना दिले. 

       याप्रसंगी त्यांनी संपूर्ण आलेले वृत्तपत्र बातम्यांची फाईल आणि काही माहिती अधिकार नगरविकास विभाग मंत्रालय उपसचिव अनिरुद्ध व्यं जेवळीकर,विशेष कक्ष अधिकारी अनिल एच. मुळे व अप्पर मुख्य सचिव यांचे कक्षाधिकारी अविनाश शितोळे यांना सादर केले आहेत. 

         साकोली सेंदूरवाफा शहरातील सामान्य जनतेच्या विकासनिधी अंतर्गत पैशाची अफरातफर करणा-यांवर पहिल्यांदाच कुणी एका जागृत मतदार-पत्रकाराने दिवाळीपूर्वीच मुंबईत जाऊन विस्फोटक बॉम्ब फोडला. 

      कारण येथे शांततामय व न बोलणारी जनतेचा पुरेपूर गैरफायदा उचलून शासकीय पैशाची अफरातफर करीत काहींनी चांगलीच मोहमाया जमविली आहे ते सुद्धा समोर आले पाहिजे अशी येथील जागृत पत्रकाराकडे जागरूक जनतेने मागणी केली होती.

       म्हणूनच शासनमान्य पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे यांनी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.