रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ/ वर्धा
वणी :- वणी नगरपरिषद निवडणुकीचे वारे आता जोर धरू लागले आहेत.
शहरातील प्रत्येक गल्लीपासून चौकापर्यंत चर्चा रंगली आहे. कोण कुठून लढणार, कोणाला तिकीट मिळणार आणि कोणावर जनतेचा विश्वास आहे?
याच पार्श्वभूमीवर भाजप युवा नेते व जिल्हा उपाध्यक्ष अॅड. कुणाल विजय चोरडिया यांचे नाव प्रभाग क्रमांक १० (ब) मधून संभाव्य उमेदवार म्हणून मोठ्या जोमाने पुढे येत आहे.
शहरातील राजकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्येही “या वेळी कुणाल बाबूंचा नंबर का?” हा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
— पक्षनिष्ठा आणि कामगिरीवर विश्वास…
अॅड. कुणाल चोरडिया हे गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या विविध पदांवर कार्यरत असून, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी तरुण कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शहरातील विविध सामाजिक आणि कायदेशीर उपक्रमांमधून त्यांनी नागरिकांमध्ये “सदैव उपलब्ध” असा ठसा उमटविला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. चोरडिया यांनी सांगितले…
“पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून जी कोणतीही जबाबदारी सोपविली, ती मी पूर्ण प्रामाणिकपणे व जबाबदारीने पार पाडेन.
पक्षाच्या आदेशानुसार कार्य करणे हेच माझे कर्तव्य आहे.”
या विधानातून त्यांच्या पक्षनिष्ठेची आणि राजकीय शिस्तीची स्पष्ट झलक दिसून येते.
नगराध्यक्षपदाची चर्चा पण आरक्षणात अडथळा काही महिन्यांपूर्वी नगराध्यक्षपदासाठी अॅड. चोरडिया यांचे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले होते.
त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि शहरातील जनाधारामुळे अनेक कार्यकर्ते त्यांना “शहराचं पुढचं नेतृत्व” मानत होते.
मात्र, या वेळच्या आरक्षणानुसार नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव ठरल्याने त्यांनी शासनाच्या निर्णयाचा सन्मान व्यक्त केला आहे.
त्यामुळे आता शहरातील सर्वांचे लक्ष प्रभाग क्रमांक १० (ब) कडे वळले आहे.
— वणी शहरात नवा राजकीय उत्साह…
भाजपच्या संघटनात तरुण नेतृत्वाला संधी देण्याची परंपरा आहे, आणि त्या पार्श्वभूमीवर अॅड. चोरडिया हे तरुण, शिक्षित आणि संघटित नेतृत्वाचे प्रतीक ठरत आहेत.
त्यांच्या सभ्य, शांत परंतु ठाम भूमिकेमुळे ते शहरातील सर्व समाजघटकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.
अंतिम प्रश्न — काय होईल निर्णय?
राजकीय समीकरणं जलदगतीने बदलत असताना, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घुमतोय..
अॅड. कुणाल चोरडिया प्रभाग क्रमांक १० (ब) मधून प्रत्यक्ष उमेदवारी दाखल करतील का?
जनतेचा पाठिंबा, पक्षाचा विश्वास आणि स्थानिक उत्साह… हे तिन्ही घटक त्यांच्या बाजूने आहेत.
आता फक्त पक्षाचा अधिकृत निर्णय उरला आहे…
आणि तो येताच वणीच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला जाईल, यात शंका नाही!



